निघोज | नगर सह्याद्री सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र महाराज सुपेकर यांचे सामाजिक काम समाजाला प्रेरणादायी असून समाजाभिमुख काम करुन समाजाला ...
निघोज | नगर सह्याद्री
सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र महाराज सुपेकर यांचे सामाजिक काम समाजाला प्रेरणादायी असून समाजाभिमुख काम करुन समाजाला पाठबळ देण्याचे कार्य होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नानजी भाई ठक्कर ठाणेवाला यांनी केले.
सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र महाराज सुपेकर यांनी कोरोना काळात तसेच शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात जी सेवा केली. त्याबद्दल त्यांचा मुंबई येथील पारनेर तालुका रहिवासी मंडळ मुंबई यांनी आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनात ठक्कर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष दादाभाउ चौधरी, मंडळाचे पदाधिकारी रामदास वाढवणे, निवृत्ती जाधव, बाळासाहेब बोरुडे, महादेव वराळ, किसन कावरे, बबन अडसूळ, प्रकाश जगदाळे, मुकेश वराळ, कुंदा जगदाळे, मुंबई येथील सेनापती बापट पतसस्थेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव गाजरे, मुंबई येथील व्यावसायिक वसंतराव बुचुडे, जी एस महानगर बँकेचे माजी संचालक महादेव वराळ, जी एस महानगर बँकेचे वरिष्ठ अधिकारी अरविंद वाढवणे, मुंबई येथील पत्रकार मृत्युंजय वाढवणे, सचिन वाढवणे पारनेर तालुका फोटोग्राफर संघटनेचे पदाधिकारी जयसिंग हरेल तसेच मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच मुंबई, पारनेर जुन्नर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
नानजी भाई ठक्कर यावेळी म्हणाले, पारनेर तालुका रहिवासी मंडळाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात सामाजिक व विवीध उपक्रम राबवीत चांगले लोकप्रबोधन व सामाजिक कामांना चालना देण्याचे काम होत आहे्. समाजाभिमुख काम करणार्या लोकांना प्रेरणा मिळण्यासाठी हा प्रयत्न चांगला आहे. सुपेकर महाराज यांनी शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक क्षेत्रात काम करताना मोठ्या प्रमाणात सेवा केली आहे.जी एस महानगर बँकेचे माजी संचालक तसेच मंडळाचे मार्गदर्शक पदाधिकारी महादेव वराळ यांनी सुपेकर महाराज यांनी केलेल्या कार्याची माहिती प्रास्ताविक भाषणात दिली. मंडळाचे पदाधिकारी दादाभाऊ चौधरी, रामदास वाढवणे, महादेव वराळ, मुकेश वराळ, अरविंद वाढवणे, सचिन वाढवणे आदिंच्या हस्ते यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कुंदाताई जगदाळे व मधुरा वराळ यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मंडळाचे पदाधिकारी अरविंद वाढवणे यांनी आभार मानले.
COMMENTS