मुंबई। नगर सहयाद्री - भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना त्यांच्या बंगल्यांमधील अतिरिक्त कामकाजासाठी सागरी नियमन क्षेत्र कायद्यातंर...
मुंबई। नगर सहयाद्री -
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना त्यांच्या बंगल्यांमधील अतिरिक्त कामकाजासाठी सागरी नियमन क्षेत्र कायद्यातंर्गत (CRZ) परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर यांना आपल्या बंगल्यांमध्ये नव्याने बांधकाम करता येईल. मुंबईतील कार्टर रोड परिसरात समुद्राला लागून सचिन तेंडुलकरचा बंगला आहे.
सचिन तेंडुलकरचा बंगल्याच्या बांधाकामाचे स्वरुप सध्या अप्पर बेसमेंट, लोवर बेसमेंट, तळमजला प्लस तीन मजले असे आहे. चौथ्या मजल्याचा भाग तेंडुलकर कुटुंबीयांकडून राहण्यासाठी वापरला जातो. या बंगल्याच्या बांधकामाला २०११ साली मंजुरी देण्यात आली होती. सागरी हद्दीत येत असल्याने सचिनच्या बंगल्याला अवघा १ फ्लोअर स्पेस इंडेक्स देण्यात आला होता. त्यामुळे सचिन आणि अंजली तेंडुलकर यांनी या बंगल्यात अतिरिक्त बांधकामाच्या परवानगीसाठी अर्ज केला होता.
सचिन तेंडुलकरने दिलेल्या अर्जानुसार त्यांना बंगल्याचा चौथा आणि पाचवा मजला बांधायचा आहे. जादाचा FSI आणि विकासाचा हक्क मिळवण्यासाठी सचिन तेंडुलकरकडून प्रीमियम भरण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. त्यानुसार सीआरझेड कायद्यातंर्गत सचिन तेंडुलकर यांना बंगल्यातील अतिरिक्त कामकाजाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता तेंडुलकर कुटुंबीयांना चौथ्या मजल्यावरील बांधकाम आणि पाचवा मजला उभारण्याची मुभा मिळाली आहे.
COMMENTS