श्रीगोंदा | नगर सह्याद्री- लोणीव्यंकनाथ येथील स्टेट बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरने फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २७ लाखांची रोकड लंपास केली...
श्रीगोंदा | नगर सह्याद्री-
लोणीव्यंकनाथ येथील स्टेट बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरने फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २७ लाखांची रोकड लंपास केली. ही घटना गुरुवारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. लोणीव्यंकनाथचे हे एटीएम मशीन फोडण्याची ही चौथी वेळ आहे.
घटनास्थळास पोलिस उपनिरीक्षक अमित माळी, पोलिस कॉस्टेबल व्ही. एम. बडे यांनी भेट दिली. गुरुवारी रात्री दोन बुरखाधारी चोरटे आले. त्यांनी सुरुवातीला विज कनेशन कट केले. यामध्ये शेजारील शिवशंभो कापड दुकानाचेही विज कनेशन कट झाले. सीसीटीव्ही कॅमेरा हाताने फिरवला आणि कॅश ठेवण्याचे लॉकर गॅस कटरच्या साहाय्याने कापले आणि सुमारे २७ लाखाची रक्कम घेऊन फरार झाले. सकाळी नऊ वाजता दुकान उघडण्यासाठी सुहास काकडे आले. लाईट लागेना म्हणून मीटर पाहिले असताना त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी पोलिस पाटील मनेश जगताप यांना खबर दिली दिली. गुरुवारी दुपारी या एटीएम मशीनमध्ये ३२ लाख टाकले होते. सुमारे पाच लाखाची रक्कम ग्राहकांनी काढली असावी. त्यामुळे २७ लाखाची रक्कम चोरीस गेली असावी असा अंदाज आहे. एएटीएम मशीनची कॅश समरी आल्यानंतर नेमकी किती रक्कम चोरीस गेली याचा उलगडा होईल.
एटीएम मशीन फोडण्याची चौथी वेळ
स्टेट बँकेचे एटीएम मशीन नगर दौंड राष्ट्रीय महामार्गावर आहे. आतापर्यत चारवेळा हे मशीन फोडण्यात आले आहे. मागील वेळी तर मशीन उचलून चालविले होते. पोलिस गाडीचे सायरन वाजले आणि चोरटे मशीन सोडून पळाले. हे चोरटे राजस्थान मधील होते. हे पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते.
COMMENTS