नाशिक। नगर सहयाद्री - नाशिक शहरात आयकर विभागाने २० एप्रिल रोजी काही कर बुडव्या बांधकाम व्यवसायिकांवर छापेमारी केली होती. गेल्या पाच दिवसांपा...
नाशिक। नगर सहयाद्री -
नाशिक शहरात आयकर विभागाने २० एप्रिल रोजी काही कर बुडव्या बांधकाम व्यवसायिकांवर छापेमारी केली होती. गेल्या पाच दिवसांपासून ही कारवाई सुरू होती. मंगळवारी ही कारवाई संपली असून यात तब्बल ३ हजार ३३३ कोटींचे बेहिशेबी घबाड हस्तगत करण्यात आल आहे. आयकर विभागाची ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगण्यात येत आहे.
नाशिकच्या आयकर अन्वेषण विभागासह छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर कार्यालयातील सुमारे २२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचं पथक नाशिकमध्ये दिवस-रात्र ही कारवाई करत होतं. जवळपास १०० खासगी वाहनातून हे पथक नाशिकमध्ये पहाटे दाखल झालं होतं. या पथकांनी नाशिकमधील बांधकाम व्यवसायिकांचे कार्यालये, बंगले, फार्म हाऊसवर छापे टाकले.
आयकर विभागाची ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगण्यात येत आहे.अधिकाऱ्यांना व्यावसायिकांचे ३३३३ कोटींचे बेहिशोबी व्यवहार उघडकीस आले असून साडेपाच कोटींची रोकड व दागिने जप्त करण्यात आल्याचे बोलले जात आहे. एका बड्या लॉटरी व्यावसायिकाकडे जवळपास १० ते १५ अधिकाऱ्यांनी तळ ठोकून दिवसभर चौकशी केली. याच छाप्यात सुमारे ७० ते ८० कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळून आल्याची चर्चा आहे.
COMMENTS