मंदार मेहत्रे ठरला चांदीच्या गदेचा मानकरी; पंजाबच्या लाडी कोहलीला दाखवले आसमा न अहमदनगर | नगर सह्याद्री- अकोळनेर येथे भैरवनाथ यात्रेनिमित्...
मंदार मेहत्रे ठरला चांदीच्या गदेचा मानकरी; पंजाबच्या लाडी कोहलीला दाखवले आसमान
अहमदनगर | नगर सह्याद्री-
अकोळनेर येथे भैरवनाथ यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या कुस्त्याच्या मैदानात शेवटच्या मानाच्या कुस्तीत अकोळनेर येथील मल्ल मंदार मेहत्रे यांनी पंजाब येथील मल्ल लाडी कोहली याला अवध्या दोन मिनिटात चितपट करत दोन लाखाचे बक्षिस व मानाची चांदीची गदा पटकवली.
अकोळनेर येथे तीन दिवस भैरवनाथ यात्रेचे आयोजन सरपंच प्रतिक शेळके यांच्या नेतुत्वाखाली करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या यात्रेत कावडीची मिरवणुक, छाबीना, लोकनाट्य तमाशा, रक्तदान शिबिर, आर्केस्ट्रा, कुस्त्याचे मैदान असे भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले होते.
या मैदानासाठी खासदार डॉ. सुजय विखे, आ. निलेश लंके, माजी आमदार शिवाजी कर्डीले, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, सरपंच प्रतिक शेळके, मनोज कोतकर, बाबूभाऊ पाटे, अभिजीत नारुडकर, शरद झोडगे, शरद बोठे, संदेश कार्ले, अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, लक्ष्मण ठोकळ, रावसाहेब साठे, आनिरुद्ध धामणे, गजानन पुंड, संजय गेंरगे, बाळासाहेब कोतकर, संजय काळे, उपस्थित होते.
या मैदानासाठी मोठया प्रमाणात मल्लानी हजेरी लावली होती. दुपारी साडेतीन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यत कुस्त्याचे मैदान चालू होते. कुस्त्या रोमाचंकारी व निकाली असल्यामुळे प्रेक्षकांची शेवट पर्यत मोठया प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली. प्रेक्षकांनी प्रत्येक कुस्तीसाठी बक्षिसाचा वर्षाव करत होते. हरीयाणा, पंजाब येथील मल्लांनी या मैदानाला हजेरी लावली. यावेळी कर्डीले म्हणाले नगर तालुयातील सर्वात मोठा हगामा अकोळनेर येथे पहावयास मिळाला. पहिलवान तयार होण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. मल्लाची आर्थिक परिस्थीती चांगली नसेल तर जिल्हा बँकेच्या माध्यमातून गाय म्हशी घेण्यासाठी कर्ज दिले जाईल.
निलेश लंके म्हणाले प्रतिक शेळके सरपंच झाल्यापासून गावचा चेहरा बदलला आहे. अकोळनेर गाव दत्तक घेतले असून आत्तापर्यत आठ कोटी रुपये निधी दिला. या हगाम्यासाठी खा. सुजय विखे, मा. आ. शिवाजी कर्डीले, आ. निलेश लंके यांनी हगाम्यासाठी ५१ हजार रुपये तर माधवराव लामखडे यांनी एक लाख रुपये दिले. बाहेरगावी उच्च पदावर काम करत असलेले बाळासाहेब लगड, अरुण गारुडकर, पंकज मेहत्रे, अब्दुल शेख याचा गावकर्याच्या वतीने सन्मान करण्यात आला. हगाम्यात पंच म्हणून अनिल मेहत्रे, बाळासाहेब शेळके, अशोक शिर्के, आनिल गुंजाळ, युवराज करंजुले, अतुल कवळे, सोमनाथ राऊत सह यांनी काम पाहिले.
COMMENTS