मुंबई- भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह पुन्हा एकदा तिच्या व्हिडीओ लीकप्रकरणी चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर एक एमएमएस लिप व्हायरल झाली. त्यात भ...
मुंबई-
भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह पुन्हा एकदा तिच्या व्हिडीओ लीकप्रकरणी चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर एक एमएमएस लिप व्हायरल झाली. त्यात भोजपुरी क्वीन अक्षरा सिंह असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. त्यावर आता अक्षराने मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने लीक व्हिडीओमागील सत्य समोर आणलं आहे. अक्षरा सध्या उत्तरप्रदेशमधील बस्ती येथे चित्रपटाचं शूटिंग करत आहे. एमएमएस लीक झाल्याच्या वृत्तामुळे तिचं मन विचलित झालं आहे. २०१८ पासून एक गँग माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे.
मी कामाच्या पहिल्या दिवसापासूनच या स्ट्रगलला सामोरं जातेय. माझं गप्प राहण्याचाच फायदा लोकांनी उचलला आहे. मी यापुढे अशा गोष्टी सहन करणार नाही. एखादा युट्यूब ब्लॉगर हे सर्व करत असेल तर मी समजू शकते. कारण पैसे कमावण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. मला मोठ्या वृत्तवाहिन्या आणि माध्यमांशी खरी समस्या आहे.
सत्य जाणून न घेता ते अशा बातम्या छापतात आणि त्यामुळेच मला जास्त दु:ख होतं. एका मुलीबद्दल असं लिहिण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला, असा सवाल तिने केला. काही दिवसांपूर्वीच भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनं इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती. या सर्व गोष्टींना वैतागून मी फाशी घ्यावी अशीच त्यांची इच्छा आहे. मात्र मी अशा गोष्टींनी खचणार नाही, असं उत्तर तिने दिलं आहे.
COMMENTS