मंदिरावर आकर्षक विद्यूत रोषणाई | यात्रेचे नियोजन पूर्ण निघोज | नगर सह्याद्री- राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा मुख्य यात्रोत्स...
मंदिरावर आकर्षक विद्यूत रोषणाई | यात्रेचे नियोजन पूर्ण
निघोज | नगर सह्याद्री-
राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा मुख्य यात्रोत्सव सुरू होत असून या यात्रेचे नियोजन करण्यासाठी निघोज ग्रुप ग्रामपंचायत पदाधिकारी, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त मंडळ, पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांची यात्रा नियोजन बैठक मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे उपाध्यक्ष शांताराम लंके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत वीज, आरोग्य, पाणी, पोलिस बंदोबस्त, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून होणार्या यात्रेकरुंसाठी सुखसोयी यावर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी निघोज सोसायटीचे चेअरमन सुनील वराळ, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, डी बी लाळगे कंट्रशनचे अध्यक्ष दत्तात्रय लाळगे, निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, किशन कन्हैया दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष शिवाजीराव लंके, माजी सरपंच ठकाराम लंके, ट्रस्टचे विश्वस्त रामदास वरखडे, अमृताशेठ रसाळ, अॅड. बाळासाहेब लामखडे, दिलीपराव ढवण, रमेश आण्णा ढवळे, बजरंग वराळ, शिवाजीराव वराळ, भास्करराव वराळ, शंकरराव लामखडे, संतोषशेठ रसाळ, बबनराव ढवण, बबनराव ससाणे, बबनराव तनपुरे, विश्वासराव शेटे, मनोहर राउत, दिलीप लाळगे, बाबुराव कवाद, विठ्ठलराव कवाद, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर लाळगे, निघोज सोसायटीचे संचालक असिमभाई हवलदार, शांताराम लाळगे, राहुल वराळ, जय मल्हार देवस्थान ट्रस्टचे सचिव सचिन लंके, नगर सह्याद्री प्रतिनिधी दत्ता उनवणे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे सहसचिव भास्करराव कवाद, पत्रकार योगेश खाडे, विजय रासकर, आनंद भुकन, व्यवस्थापक महेश ढवळे, उपव्यवस्थापक रोहन उनवणे आदी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS