(छाया / शरद झावरे, पारनेर) पारनेर पोलीसांची धडक कारवाई पारनेर / नगर सह्याद्री - तालुक्यातील राळेगण थेरपाळ मध्ये गावठी कट्टा बाळगुन दहशत करण...
पारनेर पोलीसांची धडक कारवाई
पारनेर / नगर सह्याद्री -
तालुक्यातील राळेगण थेरपाळ मध्ये गावठी कट्टा बाळगुन दहशत करणारा प्रमोद बंटी गव्हाणेच्या पारनेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक-हनुमान उगले, पो.हे.कॉ. गणेश डहाळे, पो.हे.कॉ. जालींदर लोंढे, पो.ना. गहिणीनाथ यादव, पो.कॉ. मयुर तोरडमल, सारंग वाघ, सत्यजित शिंदे, सागर धुमाळ , सुरज कदम व पथकाने पारनेर पोलीसांनी धडक कारवाई केली आहे. त्याबाबत प्रमोद बंटी गव्हाणे यास विचारपूस केली असता त्याने सदर कट्टा हा एका मित्राकडून आणल्याचे सांगितले असून त्याचे मित्राचा शोध घेतला असता तो मिळून आलेला नाही. सदर बाबत आरोपींविरूद्ध पो.कॉ. मयुर गोकुळ तोरडमल यांनी पारनेर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अनिल कातका़डे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग चार्ज उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग, अहमदनगर यांनी पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैद्य व्यवसाय व अवैद्य शस्त्रे बाळगणा-या लोकांबाबत गोपनीय माहिती काढून अवैद्य शस्त्रे, अग्निशस्त्रे बाळगणा-यांवर कारवाई करण्याबाबत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड पोलीस स्टेशन यांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या. त्यावरून पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी त्याच्या टीममधील अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून पारनेर पो.स्टे. हद्दीत अवैद्यरित्या शस्त्र बागळणा-या ईसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
दिनांक २१ एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ईसम नामे प्रमोद बंटी गव्हाणे राहणार. राळेगण थेरपाळ ता. पारनेर हा त्याचे ताब्यात एक गावठी बनावटीचे पिस्टल बाळगून असून तो त्याचे गावात त्याचे आधारे दहशत निर्माण करून गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत आहे. त्याबाबत त्यांनी पोलीस उप निरीक्षक हनुमान उगले यांना पोलीसांचे पथक तयार करून त्यांना योग्य त्या सूचना व मार्गदर्शन करून छापा कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी पोलीसांचे पथक तयार करून तात्काळ राळेगण थेरपाळ गावात जाऊन पथकाने प्रमोद बंटी गव्हाणे याचेवर सापळा लावून त्यास पोलीस आल्याची चाहूल लागताच तो पळून जात असताना त्यास शिताफीन पाठलाग करून घरासमोर पकडून पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात गावठी बनावटीची पिस्टल, पाढ-या धातूची तिचे पिस्टल ग्रिपवर काळ्या रंगाची प्लॅस्टीक मूठ स्क्रू ने बसविलेली मॅक्झीनसह मिळून आली.
COMMENTS