पारनेर | नगर सह्याद्री तालुयाच्या उत्तरेला असलेल्या मुळा नदीच्या पट्ट्यातील खडकवाडी, पळशी, वनकुटे या तालुयाच्या दुर्गम वनकुटे, पळशी या दु...
पारनेर | नगर सह्याद्री
तालुयाच्या उत्तरेला असलेल्या मुळा नदीच्या पट्ट्यातील खडकवाडी, पळशी, वनकुटे या तालुयाच्या दुर्गम वनकुटे, पळशी या दुर्गम भागातील गावांमध्ये रविवारी रात्री पुन्हा वादळी वार्याच्यासह मोठ्या प्रमाणावर झालेल्या गारपीटीमुळे हातातोंडाशी आलेली पिके उध्वस्त झाली आहेत.
गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. हातात आलेल्या पिकांना कवडीमोल भाव मिळाला. त्यापाठोपाठ गारपिटीच्या रुपाने आलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटात वादळी वार्याच्यासह पाऊस व गारपीटीला सुरुवात झाली. सुमारे पाऊण तास सुरू असलेल्या गारपीटीमुळे कांदा पिकासह मका, कडवळ, मिरची, उन्हाळी भुईमूग, काढणीला आलेला गहू ही पिके भूईसपाट झाली. उन्हाळी घासाची पाने झडल्याने शेतात केवळ काड्या उरल्या आहेत. बियाण्यासाठी राखून ठेवलेले कांद्याचे गोठ गारपीटीमुळे गळून पडले. कांद्याची पात झडली. त्यामुळे काढणीला आलेला कांदा जागेवरच सडण्याची शयता व्यक्त केली जात आहे. वादळी वार्यामुळे या परिसरातील छपरांच्या घरांचे विशेषतः जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले आहे. जनावरे उघड्यावर आली आहेत. वनकुटा परिसरामध्ये जवळपास २०० पेक्षा जास्त झाडे उनमळून पडली आहेत. तसेच अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहे. स्थानिक पातळीवर शेतीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वनकुट्यातील साहेबराव बाचकर यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने त्यांचा संसार उघडयावर आला. त्यांची मुलगी राणी हिच्या पायावर दगड पडून ती जखमी झाली. या कुटुंबाला प्रांताधिकारी व तहसीलदारांनी तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गेल्या दोन दिवसापासून झालेल्या गारासह वादळी पावसाने वनकुटे व परिसरात शेतकर्यांचे शेतीचे व घरांचे मोठे नुकसान झाल्याने प्रत्यक्ष नुकसानग्रस्त ठिकाणी जाऊन पाहणी करताना सुजित झावरे पाटील समवेत प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार अवलकंठे, गट विकास अधिकारी माने साहेब, कृषी अधिकारी गायकवाड, सरपंच व ग्रामसेवक उपस्थितीत होते.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून तालुयातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पुर्ण माहिती देण्यात आली. यावेळी नामदार साहेब यांनी येत्या एक दोन दिवसात पाहणी करणार असल्याचे सांगितले.
यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी वनकुटे व परिसरातील ग्रामस्थ उपस्थितीत होतें. यावेळी नुकसानग्रस्त शेतकर्यांना व नागरिकांना पिण्यासाठी टँकर उपलब्ध करून देणे, बांधावर जाऊन नुकसाग्रस्त शेतकर्यांची पंचनामे करून सरसकट भरपाई देण्यात यावी तसेच ज्या नागरिकांचे घरांचे नुकसान झाले आहे त्यांचे देखिल भरपाई देण्यात यावी व वनकुटे, तास, पळशी, खडकवाडी व परिसरात शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून याठिकाणी देखिल सरसकट पंचनामे करण्यात यावे अशी मागणी केली. तसेच वनकुटे येथे ज्या लोकांची नुकसान झाले आहे. त्यांना १० गहू, १० तांदूळ देण्याचे मागणी सुजित झावरे पाटील यांनी केली असता तहसीलदार यांनी संबंधित रेशन दुकानदार याला नुकसानग्रस्तांना धान्य देण्याचे आदेश दिले.
तातडीने नुकसान भरपाई द्या : सुजित झावरे
तालुयाच्या उत्तर भागातील वनकुटे पळशी येथे रविवारी रात्री पुन्हा वादळीवार्यासह झालेल्या गारपीटीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाने तातडीने पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई द्यावी या भागातील नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई मिळण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी थेट भाजप नेते सुजित झावरे यांनी संपर्क साधला आहे. त्यामुळे तालुयातील तहसील प्रशासन कृषी प्रशासन व प्रशासकीय अधिकारी हे थेट शेतकर्यांच्या बांधावर जाऊन तातडीने पंचनामे करत आहेत.
COMMENTS