अकोला।नगर सहयाद्री - अकोला जिल्ह्यातल्या बार्शीटाकळी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन शिक्षकांनी आपल्या शिक्षकी पेशाला काळिमा फासणा...
अकोला।नगर सहयाद्री -
अकोला जिल्ह्यातल्या बार्शीटाकळी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन शिक्षकांनी आपल्या शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे कृत्य केल्याची घटना उघडकीस आली. जिल्हा परिषदेच्या शाळेत ,चौथ्या वर्गात शिकत असलेल्या ४ विद्यार्थ्यांनीवर त्यांच्याच दोन शिक्षकांकडून सतत लैंगिक अत्याचार होत होते.
वृत्तसंस्थाच्या माहिती नुसार, आरोपी शिक्षक मुलींना एकटे गाठून आपले उदिष्ट साध्य करत होते. वारंवार घडणाऱ्या ह्या अप्रिय कृतीमुळे अल्पवयीन मुली भयभीत झाल्या असल्याचे समजते. या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुले व मुली मिळून केवळ ९ पटसंख्या असल्याचे समजले. ९ विद्यार्थ्यांना शिकवायला हे दोन नराधम शिक्षक कार्यरत होते. दोघेही दररोज हजर न राहता एक दिवस हा तर एक दिवस तो अशी मिलीभगत होती.
लहान मुलांवर संस्कार करायचे सोडून हे शिक्षक निरागस व अबोध मुलींचे लैंगिक शोषण करत असत. त्यांच्या मनात भीती निर्माण केल्यामुळे ते आपल्या पालकांना हा प्रकार सांगत नव्हते. दरम्यान पिडीत मुलीपैकी एकही शाळेत गेली नाही. त्या सर्व पिडीतेपैकी एकीच्या घरीच थांबल्या.पालकांनी त्यांना शाळेत न जाण्याचे कारण विचारले असता त्या चौघीपैकी एकीने वारंवार घडत असलेला प्रकार आपल्या आईला सांगीतला.
दरम्यान पालकांनी लगेच हा प्रकार बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय सोळंके यांना सांगीतला. ठाणेदार यांनी त्वरित दखल घेत दोन्ही आरोपी शिक्षकांना पोलीस स्टेशनला आणले. पिडीत मुलींच्या बयानानुसार दोन्ही शिक्षक राजेश रामभाऊ तायडे वय ४५ ,सुधाकर रामदास ढगे वय ५३ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS