मुंबई । नगर सहयाद्री - महाराष्ट्रात भरउन्हाळ्यात महाराष्ट्रावर ओढवलेले अवकाळी पाऊस व गारपिटीचे संकट ओढले आहे. शुक्रवारी मराठवाडा, विदर्भ, उत...
मुंबई । नगर सहयाद्री -
महाराष्ट्रात भरउन्हाळ्यात महाराष्ट्रावर ओढवलेले अवकाळी पाऊस व गारपिटीचे संकट ओढले आहे. शुक्रवारी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अन्य भागांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. वीज पडून बीड जिल्ह्यात दोन, तर धाराशिव जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला.
फेब्रुवारीपासून राज्यावर हे अवकाळी संकट ओढवले आहे. भरउन्हाळ्यात एप्रिलच्या २८ दिवसांपैकी ५ दिवस मध्यम ते जोरदार व इतर १४ दिवसांत हलक्या पावसाची नोंद झाली. एप्रिलमध्ये मराठवाड्यात सरासरी ३.६ मिमी अवकाळी पाऊस अपेक्षित असतो. यंदा प्रत्यक्षात ३३.६ मिमी म्हणजे ९३३.३ % विक्रमी नोंद झाली आहे. पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांना मूसळधार पावसाचा (ऑरेंज व यलो अलर्ट) इशारा दिला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाडा तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील अहमदनगर जिल्ह्यासह छत्रपती संभाजी नगर, लातूर, जालना, बीडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, नांदेड, लातूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या शहरांना पिवळा अलर्ट देण्यात आला आहे.
COMMENTS