अहमदनगर | नगर सह्याद्री केडगाव येथे विजेचा शॉक बसून एकाचा मृत्यू, तर एक जखमी झाला आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली. अक्षय शांतवन ऊर्फ पोपट प...
अहमदनगर | नगर सह्याद्री
केडगाव येथे विजेचा शॉक बसून एकाचा मृत्यू, तर एक जखमी झाला आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली. अक्षय शांतवन ऊर्फ पोपट पाटोळे (वय ३०, रा. डोंगरगण ता. नगर) असे मयताचे नाव आहे. सोमनाथ दामू भांबळ (वय ४० रा. डोंगरगण) जखमी झाले आहेत. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अरूण शांतवन ऊर्फ पोपट पाटोळे (वय ३५ रा. चांदा ता. नेवासा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ठेकेदार अमित आजिनाथ थोरात (रा. माळीवाडा) व विद्यूत महामंडळाचे अधिकारी, वायरमन यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय पाटोळे व सोमनाथ भांबळ विजेचे काम करणारा ठेकेदार अमित थोरात याच्याकडे कामाला होते. ते शनिवारी केडगाव उपनगरात चौधरी मळा येथे काम करत असताना त्यांना विजेचा शॉक बसला. यामध्ये जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच अक्षयला मृत घोषित करण्यात आले. सोमनाथवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान ठेकेदार थोरात, विद्यूत महामंडळाचे अधिकारी व वायरमन यांच्या हलगर्जी व निष्काळजीपणामुळे भाऊ अक्षयचा मृत्यू होवून त्याचा मित्र सोमनाथ जखमी झाल्याचे अरूण पाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
COMMENTS