ग्रामीण ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष लोंढे यांचा सन्मान अहमदनगर | नगर सह्याद्री काँग्रेस एक विचारधारा आहे. ज्यांना ही विचारधारा आवडते, त्यांनी क...
ग्रामीण ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष लोंढे यांचा सन्मान
अहमदनगर | नगर सह्याद्री
काँग्रेस एक विचारधारा आहे. ज्यांना ही विचारधारा आवडते, त्यांनी काँग्रेसमध्ये येऊन काम केल्यास त्यांना नक्कीच ताकद देऊ. काँग्रेसकडे लोकांचा दिवसेंदिवस कल वाढत आहे. येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानरुपी जनता परिवर्तन करेल. ओबीसी काँग्रेसचे काम सध्या महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे. नगर जिल्ह्यातही ओबीसी काँग्रेस उभारी घेईल, यात शंका नाही. काँग्रेस म्हणजे लोकांची चळवळ आहे. त्यामुळे या चळवळीत ओबीसींनी योगदान द्यावे, असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळाचे पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
श्री. थोरात व काँग्रेस ओबीसीच्या राष्ट्रीय समन्वयक मंगलताई भुजबळ यांच्या शिफारशीने अहमदनगर काँग्रेस ग्रामीण ओबीसी जिल्हाध्यक्षपदी उद्योजक संतोष लोंढे यांची नियुक्ती झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. थोरात बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय समन्वयक मंगलताई भुजबळ, सौरभ लोंढे, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देताना श्री. लोंढे म्हणाले की, सर्वांच्या सहकार्याने व राष्ट्रीय समन्वयक मंगलताई भुजबळ यांच्या पुढाकाराने मला काँग्रेस ओबीसी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे निश्चित सोने करू, असे सांगितले.
COMMENTS