पारनेर। नगर सहयाद्री सुनिल रघुनाथ पवार यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात गुंड प्रविण रसाळचा जामीण अर्ज औरंगाबाद येथील उच्च न्या...
पारनेर। नगर सहयाद्री
सुनिल रघुनाथ पवार यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात गुंड प्रविण रसाळचा जामीण अर्ज औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.
याबाबतची माहिती अशी आहे की कुख्यात गुंड प्रविण रसाळ व त्याच्या दहा ते बारा साथीदारांनी ४ जुलै २०१४ रोजी सुनिल रघुनाथ पवार यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करुण जिवघेणा हल्ला केला होता. या गुन्ह्यात रसाळ व त्याच्या साथीदारांना अटक झाली होती. त्यानंतर २०१६ मध्ये वैद्यकीय कारणासाठी रसाळ यास जामीण मंजूर झाला होता. रसाळ याने जामीणावर सुटल्यावर पवार हल्ल्याप्रकरणी प्रत्यक्ष साक्षीदार माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप पाटील वराळ यांची साथीदारांच्या सहाय्याने निघृण हत्या केली.
प्रविण रसाळ याच्यावर ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार अहमदनगर न्यायालयाने २०१८ रोजी रसाळ याचा जामीण रद्द केला होता. त्यानंतर रसाळ याने औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. तो नुकताच फेटाळण्यात आला आहे. सदर प्रकरणांमध्ये मुळ फिर्यादीतर्फे ज्येष्ठ वकील नारायण नरवडे, वकील संकेत ठाणगे यांनी काम पाहिले.
COMMENTS