१०० पेक्षा अधिक अर्ज दाखल | माघारीसाठी होणार दमछा क सुनील चोभे | नगर सह्याद्री माजी खासदार कै. दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती निव...
सुनील चोभे | नगर सह्याद्री
माजी खासदार कै. दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या स्नुषा सुप्रिया अमोल कोतकर, भाजपा नेते शिवाजी कर्डिले यांचे पुतणे संदीप कर्डिले, रोहिदास कर्डिले, माजी खासदार दादापाटील शेळके यांचे नातू अंकूश शेळके, सभापती अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, उद्योजक अजय लामखडे यांच्यासह तालुक्यातील अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज कोणत्या गटाकडून दाखल केला आहे हे अर्ज माघारीच्या दिवशीच स्पष्ट होईल.
दोन दिवसांत भूूमिका जाहीर करणारसध्या नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी सुरु असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप नेते शिवाजी कर्डिले यांचे पुतणे संदीप कर्डिले यांनी अर्ज दाखल केला. त्यांनी कोण्यात गटाकडून अर्ज दाखल केला, हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु, येत्या दोन दिवसांत ते स्वतः भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती आहे.
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी निवडणूक होत आहे. गेल्या १५ वर्षांपासून भाजपा नेते शिवाजी कर्डिले, माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या ताब्यात बाजार समितीची सत्ता आहे. कर्डिले-कोतकर यांना शह देण्यासाठी यंदा नगर तालुका महाविकास आघाडीने जिल्हा परिषद सदस्यांना रिंगणात उतरवले आहे.
कर्डिले यांचा उद्यापासून दौरागेल्या पंधरा वर्षापासून बाजार समितीवर भाजपा नेते शिवाजी कर्डिले व माजी सभापती भानुदास कोतकर यांची एक हाती सत्ता आहे. कर्डिले-कोतकर यांच्या सत्तेला शह देण्याचा नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न चालविला आहे. दरम्यान भाजपा नेते कर्डिले यांनी बाजार समितीच्या अनुषंगाने मतदारांची म्हणणे ऐकूण घेण्यासाठी प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांसह मतदारांना भेटी-गाठीसाठी वाळूंज येथे बोलावले आहे. मतदारांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतरच त्या परिसरातील संबंधित उमेदवारास अधिकृत उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
18 जागासाठी 228 अर्ज दाखल
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सभापती अभिलाष पाटील घिगे, संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, रेश्माताई चोभे, दीपक कार्ले, सुधीर भापकर, अशोक झरेकर, विलास शिंदे, रभाजी सुळ, दत्ता तापकीर, मंगलदास घोरपडे, उद्योजक अजय लामखडे, बाबा खर्से, भाऊसाहेब बोठे, सनी लांडगे, गुलाब शिंदे, राजू आंधळे, सत्यभामा कुलट, उद्धव दुसुंगे, रामदास सोनवणे, विजय शेवाळे, गोरख काळे, संजय जपकर, दिलीप भालसिंग, नंदकिशोर शिकारे, संजय गिरवले, विशाल निमसे, बहिरू कोतकर आदींसह अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. १८ जागांसाठी शंभर पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारीसाठी नेतेमंडळींची दमछाक होणार असल्याचे दिसून येत आहे.
माघारीसाठी होणार दमछाकयंदा पहिल्यांदाच शेतकर्यांनाही बाजार समिती निवडणूक लढविण्याचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे अनेक प्रगतशील शेतकर्यांसह, नेत्यांनी शेतकरी म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शेतकरी यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरुन निवडणुकीला रंगत आणली खरी. परंतु, भरमसाठ दाखल झालेले अर्ज, माघारीसाठी होणारी मनधरणी करण्यासाठी नेतेमंडळींना मात्र मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ऐवढेच नव्हे दोन्ही गटाकडून विचार न झाल्यास शेतकरी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात ठेवू शकतो.
COMMENTS