आमदार नीलेश लंके | नगर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटला सुनील चोभे | नगर सह्याद्री - माजी खासद...
आमदार नीलेश लंके | नगर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटला
सुनील चोभे | नगर सह्याद्री -
माजी खासदार कै. दादा पाटील शेळके यांनी बाजार समितीत आदर्श काम केले. जिल्ह्यात आदर्श राजकारण केलेे. बाजार समितीत शेतकर्यांना, व्यापार्यांना न्याय मिळाला पाहिजे. तसेच दादा पाटील शेळके यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता स्वस्थ बसणार नाही. कोणी वाकडा पाऊल टाकला तर आम्हीही वाकड्यात शिरु, ज्यांना कोणी नडत नाही त्यांना नीलेश लंके नडतो. त्यांचा शेवट करतो. सध्या फक्त सत्तेचा गैरवापर सुरु असल्याची टीका आमदार नीलेश लंके यांनी विखे पिता-पुतांचे नाव न घेता केली.
माजी खासदार कै. दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा महाविकास आघाडीचा शुक्रवारी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमासाठी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेस (महा. राज्य) उपाध्यक्ष घनशाम शेलार, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले, मा. जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ, माधवराव लामखडे, शरद झोडगे, काँग्रेसचे नेते संपत म्हस्के, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डीले, माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ, जि. प. मा. उपाध्यक्ष प्रतापपाटील शेळके, मा. सभापती प्रवीण कोकाटे, रामदास भोर, संदीप गुंड, माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार, रवींद्र भापकर, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक योगीराज गाडे, उद्योजक अजय लामखडे, उद्धव दुसुंगे, युवासेना सचिव विक्रम राठोड, मा. सभापती रावसाहेब शेळके, नागवडे, काँग्रेस तालुका अध्यक्ष अरुण म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, संदीप कर्डीले, रामेश्वर निमसे, डॉ. राम कदम, भाऊसाहेब काळे, अभिषेक भगत, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, प्रकाश कुलट, किसनराव लोटके आदींसह नगर तालुका महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार लंके म्हणाले, माजी खासदार दादा पाटील शेळके यांनी सुसंस्कृतपणाचे राजकारण केले. परंतु, सध्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे. सत्तेत असतांना आम्ही सत्तेचा सामान्यांसाठी वापर केला. ज्यांना कोणी नडत नाही त्यांना नीलेश लंके नडतो. त्याचा शेवटही करतो. वेळ प्रसंगी भाया वर करण्याचीही तयारी आहे. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभि बाकी है. नगर तालुक्यात आता महाविकास आघाडीची वज्रमूठ झाली आहे. त्यामुळे परिवर्तन अटळ आहे. माझी २०२२ मध्येच ईडीची चौकशी झाली. इडीवालेही येडे होवून गेले. प्रा. शशिकांत गाडे यांना किंग होता आले नाही पण ते किंगमेकर मात्र झाले आहेत. त्यांच्यावर टीका करणे म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे आहे. माझे जिल्ह्यात दोन प्रचारक आहेत. दिवस उगवल्यापासून ते माझ्यावर टीका करण्याचे काम करतात. राजकारणात दादागिरी चालत नाही. नम्रता चालते. शेतकर्यांना, व्यापार्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि दादा पाटील शेळके यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नगर बाजार समितीत बदल घडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे आ. लंके म्हणाले.
नगर तालुक्यात जिरवाजिरवीचे राजकारण ः आमदार प्राजक्त तनपुरे
बाजार समितीसाठी माजी खासदार दादापाटील शेळके यांचे योगदान मोठे आहे. नगर बाजार समिती जिल्ह्याचे ठिकाण आहे, परंतु, येथे शेतकर्यांना आपल्या मालाला योग्य भाव मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने शेतकरी इतर बाजार समित्यांना माल नेतात. यास सत्ताधारीच जबाबदार आहेत. मंत्री पदाच्या काळात मनात आणल असतं तर दोन मिनिटात संचालक मंडळ जेलमध्ये टाकलं असतं. परंतु, संचालक मंडळ फक्त नावालाच आहे. मलिदा खाणारे दुसरेच आहेत. भाग्यश्री मोकाटे यांचे जाणीवपूर्वक गुन्ह्यात गोवले. मोका लावला. गोविंद मोकाटे यांना त्रास दिला. स्वतःच्या फायद्यासाठी फक्त जिरवाजिरवीचे राजकारण केले. कार्यकर्त्यांना मोठे होवू दिले नाही. आमदारकीला खिळ बसवलीय आता बाजार समितीला ठोसा द्यायचा आहे. शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बाजार समितीत परिवर्तन घडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आमदार प्राजक्त तनपुरे असे ते म्हणाले.
जिल्हाप्रमुख गाडे म्हणाले, बाजार समितीत सत्ताधारी मंडळींनी शेतकर्यांना दुय्यम तर व्यापार्यांना प्रथम स्थान दिले. माजी खासदार दादा पाटील शेळके यांनी उभ्या केलेल्या संस्था मोडित काढण्याचे काम माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले. बाजार समितीत गाळे विकून कोट्यावधीची माया जमविली. २५ वर्ष आमदार असतांनी कोणते ठोस काम केले जे त्यांनी सांगावे. छावण्यातील शेण, तलावातील माती खाल्ली, असे म्हणून कर्डिले यांचा व्यवसाय काय असा सवाल उपस्थित केला. दोन बंगले आले कुठून, ड्रायव्हर, बंगल्यावरील कर्मचार्यांचा पगार बाजार समितीतून दिला जातो. हे होत नसेल तर त्यांनी नार्को टेस्टला सामोरे जावे. यापुढे कर्डिले यांना आमदार होवू देणार नसून खासदारकीला उभे राहिल्यास त्यांचे डिपॉझिट जप्त करु असे प्रा. गाडे म्हणाले.
रोहिदास कर्डिले, संदीप कर्डिले यांच्या जीवावर आमदार झाले. त्यांना काहीच दिले नाही. परंतु, महाविकास आघाडी त्यांना एकला बाजार समिती व एकाला जिल्हा परिषद, पंचायत समिती देणार आहे. कर्डिले यांची राजकीय दादागिरी मतांच्या जोरावर मोडीत काढू. आमदार लंके यांनाही आता ईडी पाठिमागे लावण्याची धमकी देत असल्याचे त्यांनी सांगितले. बाजार समितीत शेतकर्यांना ना नफा ना तोटा या तत्वावर कांदा गोण्या, औषधे देणार असल्याचे गाडे म्हणाले.
घनश्याम शेलार म्हणाले, गेल्या बाजार समिती निवडणुकीच्यावेळी कर्डिले हे आमदार होते. त्यावेळी दहशत होती. परंतु, आता ते आमदार नाहीत. त्यामुळे दहशतीचे राजकारण चालणार नाही. जे पुन्हा आमदार होणार नाहीत. यापूर्वी राहुरी व पारनेरचे आमदार बाजार समितीच्या निवडणुकीत लक्ष घालत नव्हते आता आमदार नीलेश लंके व प्राजक्त तनपुरे लक्ष घालणार आहेत. त्यामुळे नगर बाजार समितीत महाविकास आघाडीचा विजय हा काळ्या दगडावरील पांघरी रेश आहे. शेतकर्यांच्या हितासाठी बाजार समिती वाचली पाहिजे, बाजार समितीच्या संपत्तीत वाढ झाली पाहिजे, शेतकर्यांना न्याय मिळाला पाहिजे. बाजार समिती त्यांना जागा विकण्यासाठी पाहिजे. संस्थांच्या जागा विकण्याचा त्यांना नाद आहे. दादा पाटलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाजार समितीत परिवर्तन करा असे आवाहन यावेळी त्यांनी मतदारांना केले.
माधवराव लामखडे म्हणाले, गेली पंधरा वर्ष त्यांच्याबरोबर होता. परंतु, आता महाविकास आघाडी बरोबर आहे. तन मन धनाने काम करणार असून बाजार समितीत महाविकास आघाडीला सत्ता मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळासाहेब हराळ म्हणाले, गेल्या दहा महिन्यात प्रशासक असतांना १० कोटी ३६ लाख रुपयांचे उत्पन्न बाजार समितीला झाले. आणि सत्ताधार्यांच्या एका वर्षात १ कोटी ३६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या १५ वर्षात ७५ कोटी रुपये गायब झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. १३० कर्मचारी असतांना कॉटॅक्ट बेसेसवर ३० कर्मचारी दाखवून ४ लाख रुपये दर महिन्याला गायब करत असल्याची वस्तुस्थिती यावेळी मांडली. यावेळी नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत, काँग्रेसचे संपतराव म्हस्के, रघुनाथ झिने, प्रकाश कुलट यांनी भाषणे केली.
कर्डिले व माझे नाते जिव्हाळ्याचे ः रावसाहेब पाटील शेळके
माजी खासदार कै. दादा पाटील शेकळे यांनी राजकारणात सुसंस्कृतपणाचा आदर्श जिल्ह्याला घालून दिला आहे. त्यांनी कारखाना, दूध संघ, बाजार समितीसाठी मोठे योगदान आहे. दादा पाटील शेळके हयात असतांनाही माझे आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाते जिव्हाळ्याचे होते. आणि आताही आहेत. आणि भविष्यातही राहणार आहेत. माधवराव लामखडे व मी महाविकास आघाडीबरोबरच आहोत असे सांगून कोणतीही शंका घेऊ नये असे माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे चिरंजीव रावसाहेब पाटील शेळके म्हणाले.
उमेदवारी नाही दिली तरी आघाडीसोबत राहणार ः संदीप कर्डिले
गेल्या पंधरा वर्षापासून बाजार समितीसाठी नगर तालुका महाविकास आघाडी लढा देत आहे. या महाविकास आघाडीत स्वातंत्र्य आहे. नगर तालुक्यात प्रा. शशिकांत गाडे यांची मोठी ताकद आहे. तसेच अजून आमदार लंके व तनपुरे या दोन ताकद मिळल्या आहेत. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे करेक्ट कार्यक्रम करतात. बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी दिली तरी आणि नाही दिली तरी महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचे संदीप कर्डिले यांनी सांगितले.
COMMENTS