धुळ्यात शेतात गहू काढत असताना अंगावर वीज पडल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धुळे। नगर सहयाद्री - गेल्या दोन दिवसांपासू...
धुळ्यात शेतात गहू काढत असताना अंगावर वीज पडल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
धुळे। नगर सहयाद्री -
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. धुळ्यात शेतात गहू काढत असताना अंगावर वीज पडल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.ज्ञानेश्वर नागराज मोरे असे 48 वर्षीय मृत शेतकऱ्याचं नाव आहे.
शेतात गहू काढत असणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे, सोबतच शेतात काम करणारी महिला सुदैवाने बचावली आहे. परंतु महिला देखील या घटनेत जखमी झाली असून महिलेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार धुळे तालुक्यातील जुनवणे शिवारातील ही दुर्दैवी घटना घडली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असताना संध्याकाळच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट सुरु झाला. यावेळी ज्ञानेश्वर मोरे हे आपल्या वृद्ध आत्त्या आणि इतर मजुरांसोबत त्यांच्या शेतातील गहू काढत होते. पाऊस येईल म्हणून त्यांची लगबग सुरू होती. परंतु तेवढ्यात काळाने घात केला आणि त्यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. या घटनेत ज्ञानेश्वर मोरे यांचा जागीच मृत्यू झाला.
सोबत काम करणाऱ्या मजूरानी ज्ञानेश्वर मोरे आणि त्यांच्या वयोवृद्ध आत्या यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु ज्ञानेश्वर मोरे यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या वृद्ध महिलेवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
COMMENTS