श्रीगोंदा | नगर सह्याद्री स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी कष्टकरी शेतकर्यांनी पिकविलेल्या मालाला योग्य भाव मिळावा आणि सर्वसामान्य शेतकर्या...
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी कष्टकरी शेतकर्यांनी पिकविलेल्या मालाला योग्य भाव मिळावा आणि सर्वसामान्य शेतकर्यांची आर्थिक भरभराट व्हावी, ही दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यात पहिली बाजार समिती श्रीगोंदा तालुयात स्थापन केली. स्वर्गीय नागवडेंबरोबर आमदार पाचपुते यांनी देखील या बाजार समितीला अधिक बळ देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचे गौरदगार श्रीगोंदा बाजार समितीचे माजी उपसभापती वैभवराव पाचपुते यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काढले.
श्रीगोंदा बाजार समितीच्या निवडणूक पार्श्वभूमीवर नागवडे- पाचपुते -बाबासाहेब भोस यांनी या निवडणुकीत एकत्र येत निवडणूक लढवण्याची घोषणा यावेळी श्रीगोंदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत घोषणा केली.
यावेळी या पत्रकार परिषदेत बोलताना वैभवराव पाचपुते म्हणाले की, श्रीगोंदा येथील सरस्वती नदीच्या किनार्यावरती स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी श्रीगोंदा येथील प्रसिद्ध असणारा मैनाबाईचा बारा एकराचा पडीक माळ श्रीगोंदा बाजार समितीसाठी सहकार महर्षी नागवडेंनी स्वतःच्या पैशातून विकत घेतला. श्रीगोंदा तालुका हा दुष्काळी तालुका असल्याने कष्टकरी शेतकर्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळावा या उद्देशाने बापूंनी खर्या अर्थाने कष्टकरी शेतकर्यांचे हित जाणले. आणि जिल्ह्यात पहिली बाजार समिती श्रीगोंदा तालुयात उभी केली. आमदार पाचपुतेंनी देखील सकारात्मक दृष्ट्या या बाजार समितीला शासन स्तरावरून आर्थिक साह्य मिळवून देण्यासाठी सतत पुढाकार घेतला. बाजार समितीचा गेल्या दहा वर्षापासून कारभार पाहिला तो कशा पद्धतीने हाताळला गेला हे मी कागदोपत्री पुराव्यानिशी सांगणार आहे. नागवडे, पाचपुते गटाने एकत्रित निवडणूक लढवून वाईट प्रवृत्तींना वेळीच पायबंद घालण्यासाठी घेतलेला निर्णय अत्यंत स्तुत्य उपक्रम असून आपण सर्वजण एक दिलाने निवडणुकीला सामोरे जाऊ असे सांगितले.
यावेळी आमदार पाचपुते यांचे सुपुत्र युवा नेते प्रतापसिंह पाचपुते म्हणाले की, बाजार समिती ही शेतकर्यांची मातृसंस्था असून, स्वर्गीय शिवाजीराव नागवडे व आमदार बबनराव पाचपुते यांनी नेहमीच या संस्थेला अधिक बळ देण्याचा प्रयत्न केला. परंतु वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी एकत्र येत ही निवडणूक लादली . त्यामुळे या बाजार समितीच्या व शेतकर्यांच्या उज्वल भविष्यासाठी नागवडे, पाचपुते, भोस एकत्र आलो आहोत. कार्यकर्त्यांनी मनात कोणतीही शंका न येता आमदार बबनराव पाचपुते, राजेंद्र दादा नागवडे व बाबासाहेब भोस यांच्या समर्थ नेतृत्वाखाली बाजार समिती निवडणुकीत सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा संकल्प यावेळी पाचपुते यांनी केला.
ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यावेळी म्हणाले की, श्रीगोंदा तालुयात आमदार पाचपुते व शिवाजीराव नागवडे हे खर्या अर्थाने दिलदार नेते. लोकशाही मार्गाने निवडणूका होत असतात हे दोन्हीही नेते एकमेकांच्या विरोधात उभे असले तरी त्यांच्यामध्ये मनभेद नव्हते. चाळीस वर्षापासून मी देखील राजकारणात आहे आणि मी या दोघांच्याही राजकीय व सामाजिक कारकीर्दीचा साक्षीदार आहे. परंतु आता वाईट प्रवृत्तीची लोक राजकारणात येऊ पाहत आहेत. त्यामुळे राजकारणाची दिशा देखील वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे.
यावेळी राजेंद्र नागवडे बोलताना म्हणाले की, तालुयातील बाजार समितीचा कारभार उत्तम, गतिमान व स्वच्छ ठेवण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून पक्ष विरहित बाजार बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न होता. परंतु नुकत्याच झालेल्या खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत आम्हाला बरोबर घेतले आणि काही विघ्न संतोषी मंडळींनी आमचेच उमेदवार पाडण्याचा प्रयत्न करून गलिच्छ राजकारण केले. त्यामुळे आमदार पाचपुतें बरोबर एकत्रित येऊन पॅनल करत आहोत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज गतिमान करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन कसल्याही परिस्थितीत आम्ही एक संघ राहून निवडणूक जिंकणार आहोत, असे नागवडे यांनी सांगितले.
जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे यावेळी म्हणाले की, श्रीगोंदा तालुयाच्या वैभवासाठी स्वर्गीय बापू व आमदार पाचपुते यांनी समाज हिताचे निर्णय घेतले.बाजार समिती ही शेतकर्यांच्या जिव्हाळ्याची संस्था आहे. नागवडे, पाचपुते हे चांगल्या विचाराने या बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र आले. ही निश्चितच अभिमानाची बाब असून, सर्व उमेदवार नेत्यांच्या विचारावर निवडून येतील.
संभाजी ब्रिगेडचे नेते टिळक भोस यावेळी म्हणाले की, मागील पंचवार्षिक कालावधीमध्ये या बाजार समितीचा कारभार हा अत्यंत मनमानी पद्धतीने व कुठल्याही प्रकारचे नियंत्रण ठेवता पाहिला गेला. त्यामुळे ना संस्थेचे हित व ना शेतकर्यांचे हित अशी अवस्था या बाजार समितीची पहायला मिळाली. बाळासाहेब नहाटा आणि आमची मैत्री आजही आहे आणि उद्याही राहणार. परंतु काही तत्व पटले नाहीत. मैत्री करताना दुश्मनी तयार करण्यामध्ये ते पटाईत आहेत.बाजार समितीमध्ये बाहेरील व्यापारी हे स्वतःचा स्वार्थ साधत फसवा फसवी चे काम करत असताना डोळ्या देखत शेतकरी व बाजार समितीचा मोठा तोटा झाला. त्यामुळे बाजार समितीला व शेतकर्यांच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही नागवडे पाचपुते भोस यांच्याबरोबर या निवडणुकीत सर्व शक्तीनिशी उमेदवारांना निवडून आणणार आहोत, असे टिळक यांनी यावेळी सांगितले.
COMMENTS