मुंबई। नगर सहयाद्री - गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचे नाव गुरु रंधावासोबत जोडले जात आहे. विशेष म्हणजे नुकतेच ते...
मुंबई। नगर सहयाद्री -
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचे नाव गुरु रंधावासोबत जोडले जात आहे. विशेष म्हणजे नुकतेच तेरा की ख्याल हे गाणे मलायका आणि गुरु रंधावा यांचे रिलीज झाले आहे. यात मलायका अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसते. अनेकांनी थेट अर्जुन कपूर याचा पत्ता कट झाला असून मलायका गुरु रंधावा याला डेट करत असल्याचे म्हटले. मलायका कायमच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. मलायका तिच्या शोमध्ये अनेक खुलासे करते. तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दलही अनेक गोष्टी शोमध्ये सांगितल्या आहेत.
ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो शेअर करते. मलायका आणि अरबाज खान घटस्फोट घेणार असल्याचे कळताच चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अर्जुन कपूर याला डेट करत आहे. नुकताच मलायकाने मुलाखत दिली. यात ती म्हणाली, सेसी बॉम्बशेल या नावाने लोक मला बोलावतात किंवा ओळखतात, हे माझ्यासाठी खूप त्रासदायक होते. जेंव्हा तुमची ओळख सेसी बॉम्बशेलने होते, त्यावेळी कोणीही तुम्हाला फार गांभिर्याने घेत नाही.
जे म्हणतात, तेच तुमचा जास्त काळ विचार करतात. लोक फक्त चांगले शरीर आणि चांगल्या चेहर्याबद्दल तुमचा विचार करतात. मला माझी ही छबी बदलायची होती. मात्र हे करण्यासाठी मला खूप जास्त मेहनत घ्यायची होती.
COMMENTS