नाशिक। नगर सहयाद्री - नाशिकमधील छत्रपती संभाजीनगर रोडवर एक भयानक घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. जेजुरकर मळा टाकळी परिसरात अज्ञात हल्लेखो...
नाशिक। नगर सहयाद्री -
नाशिकमधील छत्रपती संभाजीनगर रोडवर एक भयानक घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. जेजुरकर मळा टाकळी परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी पंक्चरच्या दुकानात काम करणाऱ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करत खून केल्याची घटना घडली आहे. गुलाम रब्बानी असे मयत असलेल्या युवकाचे नाव आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, नाशिक छत्रपती संभाजीनगर रोडवर रात्री आठच्या सुमारास ही घडला घडली आहे. गुलाम रब्बानी हा युवक नेहमीप्रमाणे आपल्या पंक्चरच्या काढण्याच्या व्यवसायात व्यस्त होता. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने एकापाठोपाठ वार केले. पोटात व डोक्यावर मार लागल्याने तो जागीच मृत्युमुखी पडला. तर हल्लेखोर यांनी तेथून पळ काढला.
घटनेची माहिती मिळतात पोलीसानी घटनास्थळी धाव घेतली.घटनेची पाहणी करत त्यांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी सुरू करत तपासाची चक्रे फिरवत आहे.
COMMENTS