मुंबई / नगर सह्याद्री - राज्यभरात 8 ते 10 एप्रिलदरम्यान वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसा...
मुंबई / नगर सह्याद्री -
राज्यभरात 8 ते 10 एप्रिलदरम्यान वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात 10 एप्रिलपर्यंत गारपीटीसह जोरदार पाऊस होईल. तर, मराठवाड्यात आज (ता. 8) मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे वगळता उर्वरित महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण असून पुढील दोन दिवस अवकाळी पावसाच्या जोरदार सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे.
या ठिकाणी वादळी पावसाचा इशारा
कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव.
विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
कोकणचा काही भाग वगळता अवघ्या महाराष्ट्रावर ढग जमा झाले आहेत.
COMMENTS