मुंबई। नगर सहयाद्री - उद्धव ठाकरे यांची काल पाचोऱ्यात सभा झाली. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला. देवेंद्रजींनी ...
मुंबई। नगर सहयाद्री -
उद्धव ठाकरे यांची काल पाचोऱ्यात सभा झाली. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला. देवेंद्रजींनी तुम्हाला भावासारखे प्रेम केले.आणि आज तुम्ही त्याच पक्षाच्या सर्वोच्च नेत्याचा उल्लेख करत आहात. महाराष्ट्रात मोदीजींच वादळ येणार, विरोधक उडून जाणार. असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांची काल पाचोऱ्यात सभा झाली. उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी घराणेशाहीबद्दल बोलतात, परंतु घराणेशाहीला एक परंपरा असते. तुला आगे ना पिछे, तुला कोणी नाहीये. कधी झोळी लटकवशील आणि निघून जाशील. पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय? ते म्हणतात, मी फकीर आहे, मग झोळी लटकवून निघून जाशील, पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचे काय करायचे? अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काल उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सभेत मोदीजींचा एकेरी उल्लेख केला. १५० देशांनी त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे. मोदीजींच वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा उद्धव ठाकरे उडून जातील. मोदीजींच्या वादळाला ठाकरे घाबरत आहेत. म्हणून त्यांच्या नावाने टाईमपास करत आहात. नरेंद्र मोदी यांची उंची किती तुमची उंची किती?
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भारताला सर्वौत्तम देश बनवण्याचा ते प्रयत्न करत आहे आणि तुमची ते खिल्ली उडवत आहे. २०१४,२०१९ मध्ये ज्यांच्या भरवशावर तुम्ही तुमचे आमदार-खासदार निवडून आणले. आणि आज त्यांच्यावर एकेरी टीका करुन बेईमानी करत आहात. कितीही मशाल लावा मोदीजींच्या वादळात त्या विझणारच आहे. कुठे सूर्य कुठे तुम्ही.अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
COMMENTS