खा. सुजय विखे पाटील यांचा जोरदार घणाघात; स्वाभिमानी शिवसैनिक आमच्यासोबत पारनेर | नगर सह्याद्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पवारांच्या दावणीला...
खा. सुजय विखे पाटील यांचा जोरदार घणाघात; स्वाभिमानी शिवसैनिक आमच्यासोबत
पारनेर | नगर सह्याद्री
उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पवारांच्या दावणीला बांधली, त्याच प्रमाणे विजय औटी यांनी येथील शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. ज्यांना चोर, गुंड म्हणत होते, त्यांनाच आज लोकनेते म्हणण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. स्वाभिमानी तालुयात अशी लाचारी कधीच दिसली नाही, असा टोला खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी पारनेर येथे बाजार समिती निवडणूक प्रचार सभेत बोलताना लगावला.
भाजप व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर येथील मनकर्णिका लॉनमध्ये जनसेवा पॅनलच्या प्रचार सभेचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये खा. डॉ. विखे पाटील बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते सीताराम खिलारी, विश्वनाथ कोरडे, सुजित पाटील झावरे, राहूल शिंदे पाटील, बाबासाहेब तांबे, गणेश शेळके, वसंत चेडे, सुनिल थोरात, विकास रोहकले, अश्विनी थोरात, संजीव भोर, डॉ. भाऊसाहेब खिलारी, सागर मैड, सचिन वराळ, राजाराम एरंडे, बाळासाहेब पठारे, दिनेश बाबर, सुरेश पठारे, नगरसेवक युवराज पठारे, नगरसेवक ऋषिकेश गंधाडे, नगरसेवक भाऊ ठुबे, बाळासाहेब माळी, सुभाष दुधाडे, शशिकांत देशमुख, किसन धुमाळ, अमोल मैड, योगेश रोकडे, बापूसाहेब भापकर, अमोल साळवे, शैलेंद्र औटी, लहु भालेकर, सोनाली सालके, रामचंद्र मांडगे, सतीष पिंपरकर, शिवाजी खिलारी, विलास झावरे, किरण कोकाटे, संध्याताई काळे, सीताबाई गायकवाड, नारायण झावरे, बाबासाहेब खिलारी, संतोष गायकवाड, मोहनराव रांधवन, श्रावण गायकवाड, कारभारी आहेर, अशोक चेडे, खंडु भाईक, कैलास नर्हे आदी उपस्थित होते.
एक महिन्यात माज मोडित काढणार
पारनेर तालुयात यांनी तीन वर्षात काय काय खाल्ले याची नोंद माझ्याकडे आहे. दोघांनी मिळून हा तालुका वेठीस धरला. सरकारी यंत्रणेने तीन वर्षात पारनेर तालुयात याच दोघांच्या आशीर्वादाने माज केला. त्या यंत्रणेचा माज पुढच्या एक महिन्यात मोडीत काढलेला दिसेल, असा इशारा खा. सुजय विखे पाटील यांनी दिला.
खा. विखे पाटील म्हणाले, महाराष्ट्रात झाले ते पारनेर तालुयात झाले असून ठाकरे गटाची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शिवसेनेचे शिवसैनिक बाबाजी तांबे, गणेश शेळके आमच्या बरोबर आले. तालुयात स्वाभिमान गहाण न ठेवता अभद्र युती न स्वीकारता बाजार समितीसाठी जनसेवा पॅनलच्या पाठीशी उभे रहावे. पारनेर तालुयातील दहशत मोडुन काढण्यासाठी महिलांना व शेतरकरांना न्याय देण्यासाठी काम करण्यासाठी काम करणार आहे. विधानसभा एकमेकांविरोधात लढले.
सुजय विखे पाकिस्तानचे आहेत का?
पारनेर तालुयातील राजकारणात अनेक बॉम्ब खा. सुजय विखे पाटील फोडणार आहेत. बाजार समिती निवडणुकीत विरोधक खा. विखे पाटील हे बाहेरचे असल्याची टीका करतात. खा. विखे हे पाकिस्तानचे आहेत का? असा सवाल सुजित झावरे पाटील यांनी केला. सभापतिपदासाठी स्वतःच्या मुलीच्या डोयावर हात ठेवून खोटी शपथ घेतली, असा आरोप प्रशांत गायकवाड यांच्यावर केला.
चोर, गुंड, दरोडेखोर म्हणणारांची युती एका रात्रीत झाली नाही. ती सहा महिन्यांपासून सुरू आहे. हा संघर्ष गोरगरीब जनतेसाठी उभा केला आहे. त्यामुळे सुज्ञ जनतेने याबाबत निर्णय घ्यावा. तालुयामध्ये जे राजकारण १५ दिवसात पाहायला मिळाले, ५० वर्षे तीन पिढ्या आमचे कुटुंब जिल्हात, तालुयात राजकारणात आहे. लोकांना वेठीस धरून स्वाभिमान गहाण ठेवायचा की सर्व सामान्य जनतेसाठी काम करायचे? स्वाभिमान गहाण ठेवून काम केले असते तर जिल्ह्याचा बिहार झाला असता. मला पण तडजोड, बिनविरोध निवडीसाठी फोन आले; परंतु सर्वसामान्य जनतेसाठी ही तडजोड केली आहे.
ठाकरे गटाची उपस्थिती
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात ठाकरे गटाचे माजी सभापती बाबासाहेब तांबे, गणेश शेळके यांच्यासह नगरसेवक युवराज पठारे, देवराम ठुबे, ऋषीकेश गंधाडे यांनी हजेरी लावली. त्यामुळे पारनेर तालुयातील ठाकरे गटात उभी फुट पडल्याचे स्पष्ट झाले.
नगरपंचायत निवडणुकीत छुपी युती करण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्वसामान्य मतदारांनी दोघांना जागा दाखवून एक सर्व सामान्य कुटुंबातील तरूणी निवडून आणली. नगरपंचायतमधील नगरसेवक त्यांच्या स्वतःच्या जीवावर निवडून आले. ही छुपी युती उघड करायची होती, म्हणून त्यांना बरोबर घेतले नाही, असे खा. डॉ. विखे पाटील म्हणाले.
माजी सभापती शेळके, तांबे यांच्या एन्ट्रीने टाळ्यांचा कडकडाट
पारनेरमध्ये भाजप शिवसेना प्रणित जनसेवा सहकार पॅनेलची सभा सुरु असतांना पंचायत समितीचे माजी सभापती, शिवसेनेचे नेते गणेश शेळके यांची एन्ट्री होताच टाळ्यांचा पाऊस पडला. त्या अगोदर जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे समर्थकांसह सभेस्थळी आले असता खासदार सुजय विखे पाटील यांनी अलिंगण दिले. तसेच सभागृहा एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.
नगरसेवक पठारे, गंधाडे, ठुबे यांची व्यासपीठावर उपस्थिती
पारनेर नगरपंचायतचे शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक युवराज पठारे, ऋषी गंधाडे, नगरसेविका निता देवराम ठुबे या तीन नगरसेवकांनी जाहीरपणे खासदार सुजय विखे पाटील यांच्या व्यासपीठावर उपस्थिती लावली. तसेच माजी आमदार विजय औटी यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
मारुती रेपाळे यांच्याकडून गायकवाड, कटारिया यांची पोलखोल
आमदार नीलेश लंके यांचे समर्थक बाजार समितीचे माजी संचालक मारुती रेपाळे यांना रिपाईचे श्रावण गायकवाड यांनी फोन केला. या फोनवर रेपाळे यांनी बाजार समितीच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. सबाजी गायकवाड आणि अशोक कटारिया या दोघांनी बाजार समितीची वाट लावली. त्यांच्या कारभाराला विरोध केला. अशी जाहीर कबुली मारुती रेपाळे यांनी दिली. रेपाळे यांच्या या कबुलीमुळे प्रशांत गायकवाड आणि अशोक कटारिया यांची उमेदवारी बाजार समितीतील उमेदवारी जमीनीच्या खरेदी विक्रीपोटीच असल्याचे समोर आले आहे.
COMMENTS