मुंबई। नगर सहयाद्री - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरुन देशभरात मोठं वादंग उठलं आहे. मोदींच्या डिग्रीवर आता शिवसेनेच्या मुखपत्रातूनह...
मुंबई। नगर सहयाद्री -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरुन देशभरात मोठं वादंग उठलं आहे. मोदींच्या डिग्रीवर आता शिवसेनेच्या मुखपत्रातूनही सवाल उपस्थित करण्यात आले आहे. जे पंतप्रधान स्वतःचे 'शिक्षण' लपवत आहेत, त्यांची 'उगाच बदनामी करण्याचे कष्ट कोण कशाला करेल. पंतप्रधान अनपढ आहेत काय? त्यांचे शिक्षण किती? असा सवाल ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आला आहे.
सामनात म्हटले आहे की, विनोदी किंवा गमतीशीर भाषणे करण्यात पंतप्रधान मोदी यांचा हात कोणीच धरू शकणार नाही. अमेरिकेच्या ट्रम्प यांनाही त्यांनी मागे टाकले आहे. आता मोदी यांनी भोपाळला जाऊन आणखी एक विनोदाचा भोपळा फोडला आहे. मोदी म्हणतात, "माझी प्रतिमा मलिन करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे.पंतप्रधान मोदी यांचे हे भाषण तुफान हास्यास्पद व खोटारडेपणाचा कळस आहे.
विनोदी किंवा गमतीशीर भाषणे करण्यात पंतप्रधान मोदी यांचा हात कोणीच धरू शकणार नाही. अमेरिकेच्या ट्रम्प यांनाही त्यांनी मागे टाकले आहे. याआधी मोदी म्हणत होते, लोक मला शिव्या देतात. माझ्या मरणाची प्रार्थना करतात. मला घालून पाडून बोलतात. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत याचा त्यांना विसर पडलेला दिसतोय. मुळात पंतप्रधानांची बदनामी कोण करतोय? माझ्या बदनामीची 'सुपारी' घेतलीय अशी टोचणी त्यांना का लागलीय याचे आत्मचिंतन त्यांनी स्वतःच केले पाहिजे.
मोदींच्या बोगस डिग्रीचा विषय सध्या गाजतो आहे. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी यांनी जाहीरपणे एका मुलाखतीत व भाषणात सांगितले होते की, "मी शिकलेलो नाही. माझ्याकडे कोणतीही पदवी नाही" व नंतर अचानक मोदी यांची 'एमए'ची पदवी समोर येते व अमित शहा दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मोदींची 'डिग्री' फडफडवून दाखवतात. त्यामुळे मोदींची डिग्री खरी की खोटी, यावर लोकांनी शंका घेतली आहे
सामनात म्हटले आहे, मोदी यांना "तुमची इयत्ता कंची?" असे विचारले की, हा बदनामीचा कट आहे असा आक्षेप घेतला जातो. मुळात यात लपवण्यासारखे काय आहे? मोदी जी 'डिग्री' दाखवत आहेत ती बनावट आहे. गुजरात विद्यापीठाने जी डिग्री मोदींची म्हणून दाखवली त्यावर 'लिपी शैली'त लिहिले आहे, पण ती लिपी शैली'च 1992 साली आली व मोदींची डिग्री 1983 सालची आहे.
सामनात म्हटले आहे, आज देश मोदी यांनी घेतलेल्या जीएसटी, कृषी कायदे, नोटाबंदी अशा निर्णयांची किंमत चुकवीत आहे. देशातील शेतकरी, व्यापारी, तरुण वर्ग बरबाद झाला आहे. मोदींचे मित्र 'अदानी' यांच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. देशासाठी असे घातक निर्णय पंतप्रधान घेतात की कोणी अनपढ, गवार मंडळी घेतात? असा प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे आणि याचा खुलासा पंतप्रधानांची डिग्रीच करू शकते.
COMMENTS