धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली असून या प्रकरणी आरोपी काकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मुंबई। नगर सहयाद्री - मुंबईतील पालघर मधील ...
धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली असून या प्रकरणी आरोपी काकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
मुंबई। नगर सहयाद्री -
मुंबईतील पालघर मधील वाणगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय मनात धरून चुलत काकाने आपल्या पुतण्याची चाकूने वार करून हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. अतुल विलास तांडेल असं 23 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी आरोपी काकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
वृत्त संस्थाच्या माहितीनुसार, आरोपी दिनेश हरिश्चंद्र तांडेल हा सारखा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आसे. त्याला आपल्या पत्नीचे पुतण्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून आरोपी काकाने पुतण्या आपल्या घरात हॉलमध्ये झोपला असताना घरात जाऊन त्याच्या पोटात धारदार चाकूने वार केले. यामध्ये अतूल विलास तांडेल याचा जाग्यावर मृत्यू झाला.
या घटनेची माहितीमिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाणगाव पोलीस ठाण्यात 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. वाणगाव पोलिसांनी तपास चक्रे फिरवत अवघ्या काही तासांमध्ये शोध मोहीम राबवून आरोपीला अटक केली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
COMMENTS