अहमदनगर | नगर सह्याद्री सध्या सुरू असलेल्या आयपीएल मॅचवर सट्टा लावणार्या बुकींवर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली. एकाला अटक करण्यात आली असून...
अहमदनगर | नगर सह्याद्री
सध्या सुरू असलेल्या आयपीएल मॅचवर सट्टा लावणार्या बुकींवर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली. एकाला अटक करण्यात आली असून पाच जण पसार झाले आहेत. संदीप सुभाष सपाटे (वय ३५ रा. तोफखाना) असे अटक केलेल्या बुकीचे नाव आहे.
पोलीस अंमलदार अमोल गाढे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सपाटेंचे साथीदार चिल्का (पूर्ण नाव माहिती नाही, रा. नालेगाव), पांडुरंग बडे (रा. राहुरी), शेकटकर (पूर्ण नाव माहिती नाही, रा. भराडगल्ली), दिनेश वर्मा (रा. केडगाव), वसीम शेख (रा. नालेगाव) पसार झाले आहेत. संदीप सपाटे त्याच्या मोबाईल नंबरवरून नगर शहरातील लोकांना त्यांच्या मोबाईल फोनवर व्हॉट्सअपद्वारे आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑनलाईन सट्टा लावण्यासाठी पासवर्ड व त्याचा युझर आयडी देत होता. त्यासाठी लागणारे पैसे फोन पे व रोख स्वरूपात स्वीकारत असे. एक इसम सट्टा लावण्यासाठी सपाटे याच्याकडे गाडगीळ पटांगण येथे येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती.
त्यांनी गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक मनोज कचरे, अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, ए. पी. इनामदार, संदीप थोरात, कैलास शिरसाठ, सागर मिसाळ यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पथकाने सपाटेला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोबाईल, रोख रक्कम असा १० हजार २६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान त्याचे इतर साथीदारांची नावे पोलिसांच्या तपासातून समोर आली आहेत.
COMMENTS