नाशिक। नगर सहयाद्री - सातत्याने होणाऱ्या घटनांनी नाशिकसह जिल्हा हादरत आहे. चांदवड तालुक्यातील धोंड गव्हाणवाडी गावाच्या शिवारात ही घटना घडली ...
नाशिक। नगर सहयाद्री -
सातत्याने होणाऱ्या घटनांनी नाशिकसह जिल्हा हादरत आहे. चांदवड तालुक्यातील धोंड गव्हाणवाडी गावाच्या शिवारात ही घटना घडली आहे. चांदवड तालुक्यातील मजुरीसाठी गेलेल्या मजुरांमध्ये वाद झाला. हा वाद मनात ठेवून सोबतीला असलेल्या मजुराच्या डोक्यात दगडाने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, चांदवड तालुक्यातील धोंड गव्हाणवाडीत सुरगाणा तालुक्यातील हिरामण जाधव आणि पत्नी मीना जाधव ही आपला उदरनिर्व्हसाठी शेतमजूरीच्या कामानिम्मित काही दिवसांपासून वास्तव्यास आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक जालिंदर जाधव आणि देविदास पवार हे देखील शेतमजुरीच्या कामानिमित्त वास्तव्यास आहेत.
हिरामण जाधवने जालिंदर आणि देविदास यांना शिव्या दिल्याने त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. यावेळी किरकोळवादाचे रूपांतर हाणामारी झाल्याने जालिंदर आणि देविदास यांनी हिरामण जाधव यांच्या डोक्यात दगड टाकला, त्यानंतर हिरामण जाधव जमिनीवर कोसळले होते. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जालिंदर आणि देविदास यांनी हिरामण जाधव गोधळून गेले. घाबरत त्यांनी मृतदेह भास्कर शंकर तिडके यांच्या द्राक्ष बागेत नेऊन टाकत तिथून पळ काढला होता.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधिकारी मयूर भामरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित जालिंदर आणि देविदास यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांना चांदवड न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश महान यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
COMMENTS