अहमदनगर | नगर सह्याद्री शहरात सर्व भागांमध्ये मोठ्या संख्येने मारुतीची मंदिरे आहेत. श्रीराम नवमी नुकतीच उत्साहात साजरी झाल्यानंतर आज रामभक्...
अहमदनगर | नगर सह्याद्री
शहरात सर्व भागांमध्ये मोठ्या संख्येने मारुतीची मंदिरे आहेत. श्रीराम नवमी नुकतीच उत्साहात साजरी झाल्यानंतर आज रामभक्त हनुमानाचाही जन्मोत्सव सूर्यदयावेळी शहरात मोठ्या उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
दर्शनासाठी शहरतील सर्व मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची लगबग सुरू होती. यानिमित्त सर्व हनुमान मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई व अंतर्गत सजावट करण्याबरोबरच लाउडस्पीकर वर हनुमान चालीसा पाठ व भक्तिगीते लावण्यात आली.शहरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सर्जेपुरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आज सकाळी हनुमान जयंती भक्तिभावाने साजरी झाली. यानिमित्त पहाटे हनुमानाच्या मूर्तीला महाभिषेक, हनुमान चालीसा पाठ, रामनामाचा जप व आरती करून विधिवत पुजा करण्यात आली.
बरोबर सुर्यदयाच्या वेळी उपस्थित शेकडो भाविकांनी जय श्रीराम... जय हनुमान... जयघोषात पाळणा हलवून हनुमानाचा जन्मोत्सव साजरा केला.हनुमान जयंती निमित्त सर्जापुरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात फुलांची आकर्षक सजावट, तर मंदिरा बाहेरही आकर्षक विद्दुत रोशनाई करण्यात आली आहे. मंदिराचे पुजारी कन्हैय्यालाल परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला, अशी माहिती प्रवीण परदेशी यांनी दिली.
COMMENTS