डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त भव्य भीम महोत्सव उत्साहात अहमदनगर | नगर सह्याद्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्य...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त भव्य भीम महोत्सव उत्साहात
अहमदनगर | नगर सह्याद्री-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांच्या मार्फत भव्य भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन गीताने पाजरपोळ मैदान डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्केटयार्ड येथे प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या विविध भीम गीताने सुरुवात करण्यात आली. दरम्यान महापुरुषांचे आचरण करुन समाज प्रबोधन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
यामध्ये तुम्ही खाताय त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय र, सोन्यात भरली ओटी, भीमराव पावर फुल, तिथं जन्मले भीमराव, राजमाता जिजाऊ यांचा पोवाडा व शिवाजी महाराजांचा पोवाडा हे भीम गीत व पोवाडे ऐकून प्रेक्षक व भीमसैनिक मंत्रमुग्ध झाले. व उपस्थित त्यांनी भीम गीतावर ठेका धरला. यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित गायनाच्या कार्यक्रमानिमित्त कडूबाई खरात यांचा कार्यक्रम राष्ट्रवादीचे नेते सुरेश बनसोडे यांच्या पुढाकारातून संपन्न झाले असून नगर शहरात गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन होणार असून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या गाणे व पोवाडे ऐकून सर्व प्रेक्षकांनी आनंद घेतला.
कडूबाई खरात यांच्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन होणार असून तरुण पिढीला समाज प्रबोधनाची गरज आहे. येणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव जगामध्ये साजरी होत असून सर्वांनी महापुरुषांचे आचरण करून समाज प्रबोधन ही काळाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला आहे. तो समान अधिकार आहे. युवा पिढीने डॉ. बाबासाहेबांचे विचार मनामध्ये रुजवावे असल्याची भावना व्यक्त करत सुरेश बनसोडे यांनी कार्यक्रमाला आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करत सर्व भीमसैनिकांचे आभार मानले.
यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, अंकुश मोहिते, अशोक गायकवाड, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, सुनील त्रिंबके, अजिंय बोरकर, अभिजीत खोसे, अजय साळवे, विशाल भिंगारदिवे, पप्पू पाटील, समीर भिंगारदिवे, सिद्धार्थ आढाव, बाली बांगरे, सुजन भिंगारदिवे, महेश आठवले, निखिल कोल्हे, सतीश शिरसाट, येसुदास वाघमारे, सतीश साळवे, श्रीकांत भोसले, जय कदम, सुरज जाधव आदीसह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कालापहाड यांनी केले.
COMMENTS