श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुयातील दुधभेसळीच्या गुन्ह़्यातील सर्व आरोपी अटक करण्यात यावेत आणि महाराष्ट्रातील दूध भेसळ रॅकेट नष्ट करण्याच्...
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
तालुयातील दुधभेसळीच्या गुन्ह़्यातील सर्व आरोपी अटक करण्यात यावेत आणि महाराष्ट्रातील दूध भेसळ रॅकेट नष्ट करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी आझाद मैदान येथे उपोषण सुरू केले होते मात्र कारवाईचे आश्वासन मिळाल्यांनतर ते मागे घेण्यात आले.
यावेळी गृह विभागाचे सचिव रवींद्र औटे यांनी या उपोषणाची गांभीर्याने दखल घेत तातडीने सर्व वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना सूचना देऊन सर्व आरोपी अटक करण्यासाठी आदेश असून पोलीस, अन्न व औषध प्रशासन या दोन्ही विभागातील दोषी अधिकार्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले.
तालुकयात सुरू असलेल्या दूध भेसळीच्या रॅकेटची पाळेमुळे शिरूर, राहुरी, जुन्नर, अकलूज अशा अनेक ठिकाणी पोहचली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून हे रॅकेट राज्यव्यापी कार्यरत असून अनेक राजकीय पदाधिकारी यात सहभागी आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणा आणि अन्न औषध प्रशासन सुद्धा दबावात काम करत आहे. या गुन्ह़्यातील २४ पैकी फक्त १० आरोपी ताब्यात घेण्यात आले असल्याने संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी उपोषण सुरू केले होते.
या आमरण उपोषणाची दखल घेऊन गृह विभागाचे सचिव रवींद्र औटे यांनी भोस यांना मंत्रालायात चर्चेसाठी बोलावले असता अन्न आणि औषध प्रशासनाचे सचिवांशी चर्चा करून गुन्ह़्यातील आरोपीसोबतच भेसळीचे दूध विकत घेणारे प्लान्टधारक यांना सह आरोपी करणे, राजकीय दबावामुळे समीर अभंग हे आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याने तपास सीआयडीकडे देण्यात यावा, आर्थिक तडजोडीतुन अनेक आरोपींची नावे कमी करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले हे हेतुपुर्वक दुर्लक्ष करत आहेत. आर्थिक तडजोडीमुळे या प्रकरणातील मुख्य आरोपीवर गुन्हे दाखल केले जात नाहीत. तसेच या रॅकेटची पाळेमुळे राजकीय असल्याने आरोपींना अभय मिळत आहे अशा आशयाच्या बातम्या वर्तमानपत्रात छापून येत असल्याने समाजामध्ये संभ्रम निर्माण होत आहे. सर्व आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून आमच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यास श्रीगोंदा पोलीस जबाबदार राहतील असे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी गृह विभागाचे सचिव रवींद्र औटे यांनी या विषयात टास्क फोर्स व एसआयटी मार्फत चौकशीची मागणी करुन या संदर्भात सरकारी पातळीवर पोलीस व अन्न व औषध प्रशासन योग्य समन्वय साधून प्रयत्न करू असे आश्वासन दिले. फरार आरोपीना तात्काळ अटक करण्यासाठी पोलीस अधिक्षक राकेश ओला व उप विभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना सूचना देण्यात आल्या. श्रीगोंदा पोलीस या विषयात हलगर्जीपणा करणार नाहीत. त्याचबरोबर तपासी अधिकारी समीर अभंग यांच्या कामात त्रुटी आढळल्यास त्यांच्यावर सुद्धा कारवाई करू, असे आश्वासन औटे यांनी दिले असल्याची माहिती टिळक भोस यांनी दिली.यावेळी युवराज पळसकर,गणेश काळे,धनंजय गायकवाड, उपस्थित होते.
जोपर्यंत दूध भेसळीमधील सर्व आरोपी व रॅकेट उध्वस्त होत नाही तोपर्यत हा लढा थांबणार नाही असे टिळक भोस यांनी सांगितले.
COMMENTS