पारनेर | नगर सह्याद्री चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष रंजना शहाजी पठारे यांच्या घरी दि. ६ रोजी रात्री दीड वाजता सु...
पारनेर | नगर सह्याद्री
चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष रंजना शहाजी पठारे यांच्या घरी दि. ६ रोजी रात्री दीड वाजता सुमारे दहा ते बारा हत्यारबंद आलेल्या अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकत त्यांना मारहाण केली. व दीड तास धुडगूस घालीत घरातील कपाटे, पेट्या, कपडे, डबे यांची उचका पाचक करीत तीन ते चार लाखांचा ऐवज लुटून नेला.
सदर घटना स्थळाचा पारनेर पोलिसांनी तातडीने पंचनामा करत अहमदनगर येथून श्वानपथक, ठसे तज्ञ, एलसीबी पथक बोलाऊन तपास चालू केला. परंतु आत्तापर्यंत पोलिसांना सदर दरोड्याबाबत कोणतेही ठोस धागे दोरे हाती आले नसल्याचे समजते. त्यामुळे जवळा नागरिक व परिसरातून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत आहे.पारनेर तालुयात सध्या चोर्यांचे सत्र जोरात सुरू आहे. दरोडे चोर्या दुचाकी चोर्या, चैन स्नॅचींग गुन्हेगारी वाढू लागली आहे. मात्र पोलिसांना तपास लागत नसल्याने उलट चोरांचे मनोबल वाढून लोकांच्या मनोबलाचे खच्चीकरण होऊ लागले आहे.
ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात, पाळत ठेवून दरोडा टाकल्याचा संशय?
जवळा येथील पठारे कुटुंबियांच्या घरावर ६ एप्रिल रोजी अज्ञात दहा ते बारा चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवत सोने नाण्यासह इतर ऐवज पळून नेला आहे. त्यामुळे या कुटुंबावर पाळत ठेवून हा दरोडा टाकले असल्यास संशय पोलिसांना आला आहे. पारनेर तालुयाच्या हद्दीवर असणार्या जवळा गावाला शिरूर जुन्नर तालुयाची हद्द असून त्यादृष्टीने सुद्धा पारनेर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. तर दुसरीकडे हे चोरटे चार चाकी वाहनाने आले शयता सुद्धा पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी ठरवले तर २४ तासात तपास लावणारी तीक्ष्ण यंत्रणा पोलिसांकडे असताना आरोपी कितीही चाणाक्ष असले तरी पोलीस त्याला शोधून काढतातच परंतु नेमया पारनेर तालुयामध्येच गेल्या अनेक वर्षापासून गुन्ह्यांचे तपास लागत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या घटनेचा तपास दोन तीन दिवसात न लागल्यास जवळा ग्रामस्थ रस्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती मिळतेय. तरी जिल्हा पोलीस यंत्रणेने लक्ष घालून दरोडेखोरांना जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
COMMENTS