अहमदनगर | नगर सह्याद्री स्वच्छता अभियान काळाची गरज असून प्रत्येकाने स्वच्छता अभियानात भाग घेऊन आपला परिसर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी पुढाकार ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
स्वच्छता अभियान काळाची गरज असून प्रत्येकाने स्वच्छता अभियानात भाग घेऊन आपला परिसर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपमहापौर गणेश भोसले यांनी केले.
झेंडीगेट, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, रामचंद्र खुंट, डावरे गल्ली, हातमपुरा, बाबा बंगाली, सुभेदार चौक, कारी मज्जित परिसर, हमाल वाडा परिसर आदी ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविले. त्यावेळी ते म्हणाले, या परिसरात सर्वात जास्त कचरा असल्याचे निदर्शनास आले. स्वच्छता अभियानातून नागरिकांमध्ये जनजागृती होते. नगरकरांनी स्वच्छता अभियानात भाग घेऊन शहर स्वच्छ ठेवण्यास पुढाकार घ्यावा. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असून झेंडीगेट परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. हा परिसर रोज स्वच्छ ठेवता येईल याचे नियोजन करावे.
कचर्याचे नियोजन करणे गरजेचे
नगर शहरामध्ये गेल्या दोन वर्षापासून मनपाचे स्वच्छता अभियान विविध ठिकाणी सुरू आहे. आज मात्र झेंडीगेट परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये सर्वात जास्त कचरा या ठिकाणी आढळून आल्याचे निदर्शनात आले. या भागातील कचर्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. या भागात स्वच्छता अभियान राबविल्या बद्दल येथील नागरिकांनी उपमहापौर गणेश भोसले यांचे आभार मानले.
स्वच्छता अभियानात अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, शहर अभियंता श्रीकांत निंबाळकर, पाणीपुरवठा अधिकारी रोहिदास सातपुते, घनकचरा विभाग प्रमुख किशोर देशमुख, विद्युत विभाग प्रमुख वैभव जोशी, इंजि. मनोज पारखे, अधिकारी, कर्मचारी व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
COMMENTS