पारनेर | नगर सह्याद्री विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पारनेर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी जवळपास ८२ कोटी रुपयांचा निधी ख...
पारनेर | नगर सह्याद्री
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पारनेर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी जवळपास ८२ कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. परंतु हा निधी मिळू नये म्हणुन अधिकार्यांना थेट निलंबनाच्या सुद्धा धमया देण्यात आल्या.बजेट प्लेटमध्ये एकदा ही कामे समाविष्ट झाली तर रद्द करता येत नाहीत असा नियम असल्याने ८२ कोटीचा निधी रद्द करण्यासाठी जिल्ह्यातील एका मोठ्या भाजपा मंत्र्यांनी आदळ आपट केली, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस आमदार नीलेश लंके यांनी केला आहे. दुसरीकडे या भाजपा नेत्यांच्या चेल्यांची कॉपी पेस्ट टोळी विकास कामांचे श्रेय लाटण्यासाठी कार्यरत असल्याची टिका आमदार निलेश लंके यांनी केली आहे.
पारनेर तालुयात चेल्यांची कॉपीपेस्ट टोळी
गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात पारनेर नगर विधानसभा मतदारसंघांमध्ये विकास कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला आहे. त्यामुळे आपण आपल्या कार्यकाळात पारनेर तालुयासाठी किती निधी आणला हे दाखवून द्यावे असे जाहीर आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी भाजपा नेत्यांना दिले आहे. दुसरीकडे पारनेर तालुयात या भाजप नेत्यांच्या चेल्यांची कॉपी पेस्ट टोळी तयार झालेली आहे आम्ही मंजूर केलेल्या कामांची यादी ते स्वतःच्या नावाने सोशल मीडियात फिरवण्याचे काम करत असल्याची टीका आमदार निलेश लंके यांनी आपल्या भाषणात केली आहे.
काकणेवाडी श्रीराममंदिर सभामंडप (२० लाख) टुबुकदरा पाझर तलाव (१६.२८ लाख)व वाघदरा पाझर तलाव दुरुस्ती( १८.३ लाख) व जलजीवन मिशन पाणीपुरवठा ( ९७.८ लाख) ६३ के.व्ही.रोहित्र बसविणे( १२.७९ लाख )व विविध विकास कामांचा शुभारंभ गुरुवारी रात्री करण्यात आला.
यावेळी युवा उद्योजक संभाजी वाळुंज यांचा अभिष्टचिंतन सोहळा आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरूदत्त पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा.ठ.झावरे होते. यावेळी अर्बन बँकेचे अध्यक्ष अशोक कटारिया, राजेंद्र चौधरी, अशोक घुले, पाराजी वाळुंज, डॉ बाळासाहेब कावरे, योगेश मते, सुभाष शिंदे, भगवान वाळुंज, विजय कटारिया, सरपंच अभिजीत झावरे, राजेंद्र झावरे, पोपट रेवजी वाळुंज, मारुती वाळुंज गुरुजी, बाबा काशिनाथ वाळुंज, डॉ. मंगेश वाळुंज, तुकाराम बबन वाळुंज, संतोष वाळुंज, दिलीप वाळुंज, राजुशेठ झावरे, लहानुदादा वाळुंज, शांताराम नवले, बाबशेठ वाळुंज, विनायक पवार, दशरथ वाळुंज (टेलर), गवराम वाळुंज, सचिन वाळुंज(ग्रा.पं सदस्य), बाळासाहेब वाळुंज, ग्रा.पं सदस्य, कमल वाळुंज, गीताराम जगदाळे, दामु झावरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की,सरकार कोणाचेही असो मतदारसंघातील ८२ कोटी रुपये अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणले आहेत परंतु हा निधी रद्द करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले.बजेट प्लेटमध्ये हा निधी मंजूर झाला तो् रद्द करता येत नाही. मतदारसंघात एक कॉपीपेस्ट टोळी तयार झाली आहे. माझ्या कार्यकाळात व तुमच्या कार्यकाळात किती कामे झाली हे जनतेला दाखवावे, असे आव्हान पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांना दिले आहे.
COMMENTS