तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षीस वितरण सुनील चोभे / नगर सह्याद्री - छत्रपती शिवराय केसरी स्पर्धेच्या अंतिम कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी पै....
तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षीस वितरण
सुनील चोभे / नगर सह्याद्री -
छत्रपती शिवराय केसरी स्पर्धेच्या अंतिम कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै. महेंद्र गायकवाड यांच्यात झाली. कुस्ती दरम्यान शिवराज राक्षेच्या पायाला दुखापत झाल्याने पंचांनी महेंद्र गायकवाड याला वेजेता घोषित केले. विजेत्या मल्लाला ३५ लाख रुपयांची मानाची गदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, आमदार राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
गादी विभागात सेमी फायनल मध्ये पै. शिवराज राक्षे व पै. माऊली कोकाटे यांच्यात झाली. 12 विरुद्ध 2 अशा गुणांनी राक्षे यांनी कुस्ती जिंकत फायनल मध्ये प्रवेश केला. तर माती विभागात पै. सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात झाली. एका गुणाने पै. महेंद्र गायकवाड याने पै. सिकंदर शेखवर विजय मिळवला. या कुस्तीकडे संपूर्ण महाराष्ट्रासह कुस्ती प्रेमिंचे लक्ष लागून होते.
येथील वाडिया पार्क मैदानावर २१ ते २३ असे तीन दिवस छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
माती व गादी अशा दोन विभागात ही स्पर्धा रंगली. आहे. शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित स्पर्धेचे उद्घाटन झाले होते.
भारतीय जनता पार्टी, शिवसेना व जिल्हा तालीम संघ यांच्या संयुक्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, सुवेंद्र गांधी, अभय आगरकर, महेंद्र गंधे, दिलीप सातपुते, भानुदास बेरड, सचिन जाधव, बाबूशेट टायरवाले, सचिन पारखी, सुभाष लोंढे, संग्राम शेळके व प्रशांत मुथा आदी प्रयत्नशील होते. कुस्ती स्पर्धेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
COMMENTS