अहमदनगर | नगर सह्याद्री दिवंगत ज्येष्ठ नेते नवनितभाई बार्शीकर यांचे नातेवाईक व नवीपेठेतील व्यापारी बार्शीकर पितापुत्रांना लोखंडी सळईने मारह...
अहमदनगर | नगर सह्याद्री
दिवंगत ज्येष्ठ नेते नवनितभाई बार्शीकर यांचे नातेवाईक व नवीपेठेतील व्यापारी बार्शीकर पितापुत्रांना लोखंडी सळईने मारहाण करण्यात आली आहे. मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास घडली. सर्वेश स्वरुप बार्शीकर व स्वरुप गोपाळराव बार्शीकर असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी दोघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.
अरबाज शकीय सय्यद (रा. जुने बसस्थानक परिसर) व गिरीश सुनील वरकड (रा. बुरुडगाव रोड) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत गोपाळदास बार्शीकर यांनी फिर्याद दिली आहे. बार्शीकर यांचा पत्रिका विक्रीचा व्यवसाय आहे. त्याचा मुलगा सर्वेश दुकानातून घरपट्टीची पावती आणण्यासाठी निघाला होता. त्याच्या पाठीमागून दोन जण मोटारसायकलवरुन आले. त्यांनी बार्शीकर यांना हॉर्न दिला त्यामुळे त्यांनी आरोपींकडे पाहिले असता आरोपींनी बार्शीकर यांना अरेरावी करत शिवीगाळ केली. त्यानंतर ते तेथून निघून गेले. मात्र काही वेळाने आरोपी त्यांच्या साथीदारांना घेऊन नवी पेठेत आले व बार्शीकर यांना लोखंडी सळईने मारहाण करण्यात सुरुवात केली.
दरम्यान बार्शीकर यांच्या दुकानात काम करणारे दिनेश फुले व राजपूत भांडण सोडविण्यासाठी पुढे आले. आरोपींनी बार्शीकर यांच्या हातातील कात्री हिसकावून घेत त्यांच्याच डोक्यात मारली. त्यात स्वरुप बार्शीकर जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव घटनास्थळी दाखल झाले. तपासाची सुत्रे वेगाने फिरवत दोघांना अटक केली. आरोपी अटकेची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे, मनोज महाजन, तनवीर शेख, योगेश भिंगारदिवे, इनामदार, अमोल गाडे, संदीप थोरात, गणेश धोत्रे, सागर मिसाळ, सोमनाथ राऊत, योगेश खामकर, सतीष भांड यांनी केली आहे.
COMMENTS