मुंबई। नगर सहयाद्री - मुंबईमध्ये नुकताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसर्फे युवा मंथन मेळाव्याचे आयॊजन केले होते. मुंबईतील युवा पिढीशी संवाद साधत...
मुंबई। नगर सहयाद्री -
मुंबईमध्ये नुकताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसर्फे युवा मंथन मेळाव्याचे आयॊजन केले होते. मुंबईतील युवा पिढीशी संवाद साधताना शरद पवार यांनी, भाकरी ही फिरवावी लागते. जर फिरवली नाही तर करपनार.ती भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. आता विलंब करून चालणार नाही. मुंबईतील युवा पिढीशी संवाद साधताना मोठं विधान केलं आहे.या वक्त्यावमुळे राज्याच्या राजकारणात चर्चला उधाण आले आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसर्फे आयोजित मेळाव्यात युवा संघटनेशी शरद पवार यांनी संवाद साधला. शरद पवार म्हणाले, आयुष्याच्या उमेदीच्या काळात अनेक गोष्टींची आपल्याला माहिती आणि संधी नसते. पण निर्धार पक्का असला तर आपण अडचणींवर मात करू शकतो. त्यामुळे पक्षाला नेतृत्व तयार करण्यासाठी तरूणांपासून सुरुवात करावी लागेल.
शरद पवार म्हणाले,राज्याच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेससाठी कष्ट करणारे, वेळ देणारे, लोकांमध्ये समरस होणारे हजारो कार्यकर्ते आहेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी तरूणांनी विचारधारा आणि कष्ट या दोन गोष्टींचा आधार घेतला तर जीवन यशस्वीच होणार. समाजात काही व्यक्तींना पद असो अथवा नसो कार्यकर्त्यांमध्ये सन्मान असतो. तो सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पुढील पायरीवर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे.
शरद पवार म्हणाले, संघटनेच्या माध्यमातून योग्य ती संधी देऊन एक नवीन नेतृत्व तयार केले जाईल. आता विलंब करुन चालणार नाही, भाकरी ही फिरवावी लागते. ती फिरवली नाही तर करपते. ती भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. ते काम पक्षात करण्याचा आग्रह संघटनेतील वरिष्ठ नेत्यांकडे केला जाईल.असल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे.
COMMENTS