पुणे। नगर सहयाद्री - राज्यभरातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती हाती आली आहे. परीक्षा झाल्यानंतर निकाल कधी ...
पुणे। नगर सहयाद्री -
राज्यभरातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती हाती आली आहे. परीक्षा झाल्यानंतर निकाल कधी लागतो, यासाठी राज्यभरातील लाखो विद्यार्थी वाट पाहतायत. नुकतीच बोर्डातील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा निकाल वेळेवरच लागतील. जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावी बोर्डाचा तर लगेच दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्यात मागील महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेंशन योजनेच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारला होता. या संपात खासगी तसेच सरकारी शाळांच्या शिक्षकांचाही समावेश होता. त्यामुळे अनेक शाळांतील कामकाज ठप्प झाले होते. या संपामुळे दहावी-बारावीच्या निकालांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती. उत्तर पत्रिका तपासण्या विलंब लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल ठरलेल्या वेळेतच लागणार आहेत.
परीक्षांच्या उत्तर पत्रिका तपासण्याची मोठी जबाबदारी असलेल्या शिक्षक तसेच शिक्षकेतर संघटनांनी संपात सहभाग नोंदवला होता. मात्र आता उत्तर पत्रिका तपासणीचे काम जलद गतीने सुरु आहे. त्यामुळे दहावीचे पेपर तपासण्याची डेडलाइन १५ एप्रिल असेल तर त्याआधी बारावीचे पेपर तपासून पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.दहावी आणि बारावीचा निकाल वेळेत लागावा, यासाठी राज्य मंडळातर्फे युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या प्रक्रियेतील सर्वच शिक्षक, कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांचे योग्य सहकार्य मिळत आहे. त्यामुळे येत्या जून महिन्यात पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
COMMENTS