नवी दिल्ली / वृत्तसंस्था- निष्काळजीपणा केल्यास तुमच्या घरातही असा प्रसंग घडून पश्चातापाची वेळ येऊ शकते. अशा प्रकारच्या घडना रोखण्यासाठी आपण...
नवी दिल्ली / वृत्तसंस्था-
निष्काळजीपणा केल्यास तुमच्या घरातही असा प्रसंग घडून पश्चातापाची वेळ येऊ शकते. अशा प्रकारच्या घडना रोखण्यासाठी आपण अतिशय अलर्ट राहण्याची गरज आहे. नेहमी सावध, सतर्क राहणे महत्वाचे आहे. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरु शकते. थोडासाही निष्काळजीपणा केल्यास तुमच्या घरातही असा प्रसंग घडू शकतो.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, उत्तराखंड येथील हरिद्वार जिल्ह्यातील नवोदय नगर रोशनाबाद येथील एका विवाहीत महिलेसोबत घडली आहे. नवोदय नगर, रोशनाबाद येथे राहणाऱ्या मिस्टर शर्मा यांच्या घरात दोन युवक खोली भाड्याने घेण्यासाठी व त्या संदर्भात बोलणी शुक्रवारी दुपारी करण्यासाठी आले होते. त्यावेळी शर्मा यांची पत्नी घरात एकटी होती. त्या भाड्याने देण्याची खोली दाखवण्यासाठी वळताच दोघांपैकी एका युवकाने त्यांच्या तोडांवर हात ठेवत ते बंद केले. तर दुसऱ्या युवकाने त्यांच्या गळयातील सोन्याची चेन, सोन्याचे कानातले आणि चांदीचे पैंजण खेचून घेतले.
मिसेस शर्मा यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करताच त्या युवकांनी त्यांना जिवानिशी मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या दोन ठकांनी मिसेस शर्मा यांना त्यांच्याच खोलीत बंद करत दाराला बाहेरून कडी लावली व घटनास्थळावरून पोबारा केला. शर्मा यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला असता, शेजारी राहणाऱ्या लोकांनी दार उघडले व संपूर्ण घटनेचा खुलासा झाला.
घटनेनंतर महिलेने आरडाओरडा केला असता आजूबाजूच्या लोकांनी कडी उघडून त्या महिलेला खोलीच्या बाहेर काढले. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात युवकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी नवोदय नगर चौकात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज हस्तगत केले आहे.
COMMENTS