आ. नीलेश लंके यांच्या प्रयत्नांना यश | विविध विकास कामांचा शुभारंभ पारनेर | नगर सह्याद्री- संपूर्ण जग डिजिटल जमान्यात वावरत असताना पारनेर त...
आ. नीलेश लंके यांच्या प्रयत्नांना यश | विविध विकास कामांचा शुभारंभ
पारनेर | नगर सह्याद्री-
संपूर्ण जग डिजिटल जमान्यात वावरत असताना पारनेर तालुयातील नांदूरपठार हे गाव मात्र मोबाईलच्या रेंजपासून दुर होते. ग्रामस्थांच्या मागणीनंतर आ. नीलेश लंके यांनी बीएसएनएलकडे पाठपुरावा करून या गावासाठी टॉवर मंजुर करून घेतला असून लवकरच नांदूरपठारमध्ये मोबाईलची रिंग वाजणार आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्या राणीताई लंके यांच्या हस्ते टॉवर उभारणीचा शुभारंभ करण्यात आला.
नांदूरपठार येथे टॉवर उभारणीबरोबरच १० लाख रूपये खर्चाचे स्मशानभूमी ते कोठार वस्ती रस्ता काँक्रीटीकरण, ३ लाख रूपयांचे ग्रामपंचायत शौचालय, ३ लाख रूपये खर्चाचे प्राथमिक शाळेतील शौचालय, २ लाख २० हजार रूपये खर्चाच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम, हायमास्ट दिवे २ लाख, जिल्हा परिषद शाळेसाठी संरक्षक भिंत ५ लाख या कामांचे भूमिपुजनही करण्यात आले.
नगर व पुणे जिल्हयाच्या सीमेवर असलेल्या नांदूरपठारमध्ये आ. नीलेश लंके यांच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लागली असली तरी मोबाईलला नेटवर्क नसल्याने हे गाव जगापासून कोसो दुर होते. मोबाईल टॉवर उभारण्यासाठी ग्रामस्थांनी आ. लंके यांना साकडे घातले होते. लंके यांनी त्यासाठी बीएसएनएलकडे पाठपुरावा करून नांदूरपठारसाठी स्वतंत्र टॉवर मंजुर करून घेतला. लवकरच टॉवर उभारणीचे काम पुर्ण होऊन नांंदूरपठारकर मोबाईलवरून संपूर्ण जगाशी संपर्क करू शकणार आहेत.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अशोक घुले, सरपंच श्रामिनी संदीप चौधरी, माजी सरपंच रविंद्र राजदेव, वनकुटयाचे माजी सरपंच अॅड. राहुल झावरे, रविंद्र गायखे, उपसरपंच हरी देशमाने, चेअरमन मदन देशमाने, नारायण राजदेव, बबन गाढवे, सुरेश आग्रे, सुनील राजदेव, नारायण आग्रे, मोहन शिंदे, शशीकांत आग्रे, पोपटदादा राजदेव, दत्ता देशमाने, दत्ता चौधरी, शंकर आग्रे, नवनाथ पाटील घोलप, बाळासाहेब लंके, मंगेश लंके, महेंद्र अभंग, कचरू मते, शुभम आहेर, नितीन राजदेव, बाळू घोलप, कैलास आग्रे, स्वप्निल राजदेव, रामदास राजदेव, पोपट रेपाळे, अजित भाईक, विष्णू घोलप, मच्छिंद्र उंडे, कैलास दिवेक, नुर कुरेशी यांच्यासह ग्रामस्थ, मुंबई, पुणेकर मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.
COMMENTS