कोपरगाव। नगर सहयाद्री बाजार समितीच्या निवडणुकांनी धुमाकूळ घातला आहे.सत्यासाठी कट्टर विरोधक मानले जाणणारे एकाच बाकावर पहावयाला मिळत आहे. राज...
कोपरगाव। नगर सहयाद्री
बाजार समितीच्या निवडणुकांनी धुमाकूळ घातला आहे.सत्यासाठी कट्टर विरोधक मानले जाणणारे एकाच बाकावर पहावयाला मिळत आहे. राजकारणात कधी काय होणार याचा नेम नसतो. कोपरगाव बाजार समितीच्या निवडणुकीत असाच एक प्रकार पाहायला मिळत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप,आणि ठाकरे समर्थकांची एक्सप्रेस धावताना दिसत आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार एकीकडे एकमेकांचे प्रतीस्पर्धी असलेले राजकीय नेते बाजार समितीच्या निवडणुकीत एकमेकांना साथ देताना दिसत आहेत. कोपरगाव बाजार समितीत काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या विरोधात भाजप, राष्ट्रवादी, ठाकरे समर्थकांचा एक फुटीर गट निवडणूक लढवत आहेत.
कोपरगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आशुतोष काळे आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे समर्थकांनी या निवडणुकीत एकत्र पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकमेकांच्या सहकार्यासाठी तयार झालेल्या या अनोख्या युतीची चर्चा सध्या होत आहे.
COMMENTS