गांधीगिरी करणार्या शेतकर्यांचे पेरू दिले फेकून मुजोर अधिकार्यांना निलंबित करावे; अध्यक्ष सचिन भालेकर पारनेर | नगर सह्याद्री शिवपानंद रस्त...
गांधीगिरी करणार्या शेतकर्यांचे पेरू दिले फेकून
मुजोर अधिकार्यांना निलंबित करावे; अध्यक्ष सचिन भालेकर
पारनेर | नगर सह्याद्री
शिवपानंद रस्ते तसेच पुरातन जलस्रोतांबाबतच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पेरू वाटून गांधीगिरी करणार्या शेतकर्यांचे पेरू फेकून देत तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. तर दुसरे सामाजिक प्रश्नासाठी वर्गणी करून आंदोलनाचा छापण्यात आलेला फलक व सर्व साहित्य गेटबाहेर फेकून द्या, असा आदेश तहसीलदारांनी दिल्यानंतर कर्मचार्यांनी पेरू फेकून देताना फलकही फाडून टाकला व पेरू गेटबाहेर नेऊन टाकण्यात आले.
आंदोलकांचा अवमान केला नाही; आवळकंठे
पारनेर तालुयातील रस्त्यांबाबतच्या सुमारे ५०० प्रकरणांवर सध्या काम सुरू आहे. वादी प्रतिवादींच्या सुनावण्या सुरू आहेत. यासंदर्भात तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आंदोलकांनी पेरू वाटप आंदोलन सुरू केले. कर्मचारी पेरूचे क्रेट बाजूला करीत असताना काही पेरू खाली पडले. पेरू फेकून दिले नाहीत. आंदोलकांचा अवमान या केलेला नाही, असे तहसीलदार आवळकंठे यांनी सांगितले.
सप्तपदी अभियानांतर्गत शिवपानंद शेत रस्त्यांच्या अर्जावर तातडीने निर्णय घेण्यात यावा, पारनेर तालुयात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावोगावच्या पाझर तलावांसह पुरातन जलस्रोतांच्या तातडीने दुरुस्त्या करण्यात याव्यात. सप्तपदी शेततरस्ते, शिवपाणंद रस्ते अभियानाच्या नावाखाली सर्वसामान्य शेतकर्यांची घोर फसवणूक करणार्या संबंधित अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, भाऊसाहेब वाळुंज, अनिल खोमणे, दशरथ वाळुंज, बाळासाहेब औटी, संतोष लोणकर, हौशीराम कुदळे यांनी तहसीलदार, पोलिस निरीक्षकांना निवेदन देत दि. २४ एप्रिल रोजी तहसील कार्यालयात येणार्या नागरिकांना पेरू वाटून गांधीगिरी आंदोलन करण्याचे कळविले होते.
मुजोर तहसीलदारांना तातडीने निलंबित करावे;भालेकर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या तालुयातील तहसीलदार आंदोलकांवर अशा प्रकारे अरेरावी व उद्धटपणे रस्त्यावरच्या गुंडासारखी दादागिरी करत असेल तर निंदनीय आणि तहसीलदारपदाला काळीमा फासणारे आहे. १४४ कलम लागू आहे, तर आंदोलकांना नोटीस देऊ शकत होते. दादागिरी करण्याचा अधिकार यांना कुणी दिला. अशा प्रवृत्तीला निलंबन हाच उपाय, जिल्हाधिकार्यांनी तातडीने या तहसीलदाराचे निलंबन करावे, अशी मागणी पारनेर परिवर्तन संस्थापक अध्यक्ष सचिन भालेकर यांनी केली आहे.
निवेदन दिल्यानंतर शरद पवळे व त्यांच्या सहकार्यांनी तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर स्टॉल लावून पेरू वितरण करण्यास सुरुवात केली. तहसील कार्यालयातील कर्मचार्यांनाही पेरूचे वितरण करण्यात आले. त्यावेळी दालनात बसलेल्या तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांना या आंदोलनाची कुणकुण लागली. त्यांनी तडक दालनाबाहेर येत आंदोलकांवर आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
आंदोलन मोडणार्या प्रशासनाचा निषेध
कित्येक दिवसांपासून शेत रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. गांधीगिरी मार्गाने शेतकर्यांचा संताप व्यक्त करीत होते. मात्र आपला अकार्यक्षम पणा लपविण्यासाठी आमचे आंदोलन मोडून काढण्यात आले. तहसील कार्यालयातून हाकलून देण्याची भाषा वापरण्यात आली. त्यामुळे शांततेच्या मार्गाने आंदोलन चालु असताना तहसिलदार शिवकुमार आवळकंठे यांनीच कायद्याचा धाक दाखवत आंदोलन चिरडले असून आम्ही प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करतो.
-शरद पवळे, आंदोलक.
सध्या १४४ कलम लागू असेल असा तमाशा या ठिकाणी चालणार नाही म्हणून निवेदन काय द्यायचे असेल ते द्या आणि ते फक्त दोन लोकांनी द्यावे अन्यथा १४४ कलम लागू असल्याने जेलमध्ये टाकण्याची भाषा सुद्धा आंदोलकांना तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी केली. तर दुसरीकडे कर्मचार्यांना बोलावून घेत हे पेरू फेकून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
COMMENTS