संभाजीनगर। नगर सहयाद्री- शिवसेनेच्या शिंदे गटातील एका नेत्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आगामी लोकसभा निवडणु...
संभाजीनगर। नगर सहयाद्री-
शिवसेनेच्या शिंदे गटातील एका नेत्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आगामी लोकसभा निवडणुकीआधी भाजपात जातील, असं मोठं विधान शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार बसणार असल्याचं स्पष्ट होत आहे. संजय शिरसाट यांनी आतापर्यंत ज्या ज्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. ते खरंच झालं आहे. हा दावा करताना शिरसाटांनी चव्हाण भाजपात का जातील याची कारणंही सांगितली.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, काँग्रेसमध्ये एक वाक्यता नाही. अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांचं जमत नाही. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांचं जमत नाही. हे तुम्ही पाहत आहात. मला तरी असं वाटतंय की अनेक दिवसांच्या ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यानुसार अशोक चव्हाण हे लोकसभेपूर्वी भाजपमध्ये जातील असं माझं मत आहे. एवढा मोठा नेता त्यांना काँग्रेसमध्ये वागणूक बरोबर मिळत नाही. ते निश्चितच भाजपमध्ये जातील, असं संजय शिरसाट म्हणाले.
संजय शिरसाट म्हणाले, “ही वज्रमूठ नव्हती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरेंची मजा घेण्यासाठी मंचावर बसले होते. हे कधीही एक होणार नाहीत. त्या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आले नाहीत. ते एवढे आजारी होते का की, सभेला आले नाहीत. आज तेच नाना पटोले सुरतला कोर्टात चालले आहेत.” बाळासाहेब थोरात भाजपमध्ये जाणार नाहीत. कारण विखे आणि थोरात यांचं विळ्या भोपळ्याचं नातं आहे. विखे पाटील जर काँग्रेसमध्ये गेले तर थोरात भाजपमध्ये जातील. असं त्यांचं उलटंपालटं गणित आहे. पण अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याची मानसिकता तयार केली आहे, असा दावाही शिरसाट यांनी केला.
पुढे बोलताना म्हणाले, सुषमा अंधारे हा विषय माझ्यासाठी संपला आहे. ती बाई प्रसिद्धीसाठी सर्व काही करत आहे. त्यांना अब्रूनुकसानीचा दावा करायचा आहे, सुप्रीम कोर्टात जायचंय, राष्ट्रपतींकडे जायचंय हा त्यांचा प्रश्न आहे. मला त्यावर उत्तरच द्यायचं नाहीये, असं शिरसाट म्हणाले. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. मी आधीच सांगितलं की, तुम्ही महिला आयोगाकडे जा. पोलिसात जा. चौकशी झाली पाहिजे हे माझं मत आहे. एकदा यांना उघडं पडू दे. जे काही व्हायचं ते होईल, असं ते म्हणाले.
COMMENTS