अहमदनगर / नगर सह्याद्री- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना धमकी देण्यात आली आहे. अण्णा हजारे यांची हत्या करणार, अशी धमकी देण्यात आली आहे. ...
अहमदनगर / नगर सह्याद्री-
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना धमकी देण्यात आली आहे. अण्णा हजारे यांची हत्या करणार, अशी धमकी देण्यात आली आहे. अन्यायग्रस्त नागरिकांनी हा इशारा दिला आहे.
शेतीच्या वादातून कुटुंबावर अन्याय झाला, असा आरोप ठेवण्यात आला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव गावातील ही घटना आहे. शेतीच्या वादातून गटातील 96 जणांनी संतोष गायधने यांच्या परीवारावर दबाव आणला. खोट्या केस दाखल करण्याचा प्रयत्न केला. हे कुटूंब भीतीच्या सावटाखाली जगतंय. अण्णा हजारेंसह वरीष्ठ पोलीस आणि मंत्र्यांनाही याबाबत निवेदन देण्यात आलं होतं. मात्र काहीच कारवाई होत नसल्याने गायधने कुटूंब हतबल झालं. त्यांनी राष्ट्रपतींकडे आत्महत्येची परवानगी मागितली. मात्र आता श्रीरामपूरातील संतोष गायधने यांनी अण्णा हजारे यांना मारण्याचा इशारा दिला आहे. 1 मे रोजी अण्णा हजारेंची राळेगण सिद्धीत जावून हत्या करणार असा इशाराच या कुटुंबाने दिला आहे.
COMMENTS