मुंबई। नगर सहयाद्री - राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडण्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. एकाच महिन्यात अमित शहा दुसऱ्यांदा मुंबईत आले आहे...
मुंबई। नगर सहयाद्री -
राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडण्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. एकाच महिन्यात अमित शहा दुसऱ्यांदा मुंबईत आले आहेत. एका लग्नसमारंभासाठी ते मुंबईत आले असले तरी ते पक्षीय बैठक घेतली जाण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.अमित शहांनी दिल्ली मुंबई अप-डाऊन करण्यापेक्षा मुंबईमध्येच एखादा दोन बीएचके फ्लॅट घेऊन टाकावा अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उद्घाटनासाठी ते येणार होते. मात्र, तो दौरा रद्द झाला होता. त्यामुळे महिनाभरातील हा त्यांचा दुसरा महाराष्ट्र दौरा असेल.एकाच महिन्यात अमित शहा दुसऱ्यांदा मुंबईत आले आहे. खारघर येथील महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी यापूर्वी ते मुंबईत आले होते.आज सकाळ 10.30 वाजेच्या दरम्यान ते मुंबईत आले.अमित शहा यांचा मुंबई दौरा खासगी कारणासाठी असल्याचे समजले जात असले तरी पक्षीय बैठक घेतली जाण्याची शक्यता असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, अमित शाह यांनी दिल्ली ते मुंबई येणं-जाणं करण्यापेक्षा मुंबईमध्येच एखादा दोन बीएचके फ्लॅट घेऊन टाकावा. एका रुममध्ये त्यांनी राहावं आणि दुसऱ्या रुममध्ये पंतप्रधान मोदी यांनी राहावं. सारखं सारखं अप-डाऊन करू नये. मुंबईत महापालिकेच्या निवडणुकीसाठी इतक्या फेऱ्या मारण्याची गरज नाही” असेही त्या म्हणाल्या.
COMMENTS