मुंबई। नगर सहयाद्री - राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजि...
मुंबई। नगर सहयाद्री -
राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे लवकरच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाणार आहेत. राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा दावा केला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमधून त्यांनी एक प्रकारे भाजपचा पुढचा प्लॅनच सांगितला आहे. दमानिया यांच्या ट्वीटनंतर चर्चांना उधाण आलं आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, “आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, १५ आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहेत. तेही लवकरच. महाराष्ट्राच्या राजकारणाची आणखी किती दुर्दशा होतेय ते बघू.”
आधी अजित पवार गेल्या आठवड्यात नॉट रिचेबल झाले होते. त्यावेळीही अंजली दमानिया यांनी फडणवीस आणि अजितदादांच्या शपथविधीचा फोटो पोस्ट केला होता. त्यावर, किळसवाणी राजकारण… मी पुन्हा येईन, अशी सूचक कमेंट केली होती.पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा वारंवार होतात. अशातच या ट्वीटने या चर्चांना आणखी वेग आला आहे. त्यामुळे आता यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
COMMENTS