कोतवालीत दाखल झाला गुन्हा दमबाजीचा! अहमदनगर / नगर सह्याद्री शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने शिवसेनेच्याच पारनेर तालुका प्रमुखास बदडून काढल्याच...
कोतवालीत दाखल झाला गुन्हा दमबाजीचा!
अहमदनगर / नगर सह्याद्री
शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने शिवसेनेच्याच पारनेर तालुका प्रमुखास बदडून काढल्याची घटना नगर मध्ये घडलीय. कामांच्या मुद्द्यावर सुरू झालेली चर्चा थेट गुद्दा गुद्दीवर गेली.
शिवसेनेचे विकास रोहकले असे मारहाण झालेल्या तालुका प्रमुखाचे नाव आहे. या संदर्भात रोहकले यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. रोहकले यांच्या तक्रारी वरून अनिल शिंदे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 6) सायंकाळी चार वाजता मार्केट यार्ड परिसरातील कार्यालयात घडली. या घटनेने शिवसेना वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तालुका प्रमुख विकास रोहकले व जिल्हा प्रमुख अनिल शिंदे हे मार्केट यार्ड परिसरातील कार्यालयात गुरुवारी एकत्र आले होते. या दरम्यान,
'तू परस्पर कामे कशी आणली... तू, तुझा मुलगा, बायको नगरमध्ये कशी राहतात', असे म्हणून शिंदे यांनी दमबाजी व धक्काबुक्की केली. असे रोहकले यांनी तक्रारीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.
दरम्यान, अनिल शिंदे यांनी विकास रोहोकले यांना कार्यालय परिसरात मारहाण केली. मारहाण सोडवण्यासाठी कार्यकर्ते पुढे आले. दोघानाही शांत केल्यानंतर विकास रोहोकले हे पोलिसात गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे अनिल शिंदे व विकास रोहोकले आहेत. दोघेही शिंदे समर्थक आणि जबाबदार पदाधिकारी असताना दोघांनीही एकमेकांच्या वर हात उचलले ही धक्कादायक बाब आहे. मारहाणीच्या या घटनेची आज दिवसभरात जोरदार चर्चा झाली.
COMMENTS