भंडारा । नगर सहयाद्री - भंडारा जिल्हातील तुमसर बाजार समितीच्या निवडणूकीच्या अनुषगांने हरदोली येथील माजी सरपंच सदाशिव ढेंगे यांनी ही याचिका द...
भंडारा । नगर सहयाद्री -
भंडारा जिल्हातील तुमसर बाजार समितीच्या निवडणूकीच्या अनुषगांने हरदोली येथील माजी सरपंच सदाशिव ढेंगे यांनी ही याचिका दाखल केली होती. नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठीत याचिका दाखल करण्यात आली होती. तुमसर बाजार समितीची निवडणूकीस नागपूर उच्च न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिले आहेत.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसा, तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेअंतर्गत 27 मार्चपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत. यासाठी 3 एप्रिल हा अखेरचा दिवस हाेता. दरम्यान भंडारा जिल्हाच्या मोहाडी तालुक्यातील 58 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सरपंच व सदस्यांना प्रतिनिधीत्व नसल्याच्या मुद्यावरून हरदोली येथील माजी सरपंच सदाशिव ढेंगे यांनीत्यावर न्यायालया याचिका दाखल हाेती.17 नोव्हेंबर 2022 पासून नियुक्त असलेले प्रशासकच बाजार समितीचा कारभार पाहत आहेत.
तुमसर आणि मोहाडी तालुक्याचा समावेश असलेल्या बाजार परिसरात अनुक्रमे 97 आणि 74 ग्रामपंचायती आहेत. त्यातील 75 पैकी 58 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना राज्य निवडणूक आयोगाने 23 नोव्हेंबर 2012 रोजी स्थगिती दिली आहे.आजपर्यंत या निवडणुका झालेल्या नाहीत, पन्नास टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतींना बाजार समितीत प्रतिनिधित्व मिळण्यापासून वंचित राहावे लागणार होते. हा मुद्दा उपस्थित करुन याचिकाकर्ते माजी सरपंच सदाशिव ढेंगे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे रिट याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने तुमसर बाजार समिती निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली आहे अशी माहिती सदाशिव ढेंगे यांनी दिली.
COMMENTS