अहमदनगर | नगर सह्याद्री बॅरेकेटिंग करण्यास विरोध करून बॅरेकेटिंग फेकून देत पोलिस कर्मचार्यांना शिवीगाळ केल्याची घटना माळीवाड्यातील भोपळेगल...
अहमदनगर | नगर सह्याद्री
बॅरेकेटिंग करण्यास विरोध करून बॅरेकेटिंग फेकून देत पोलिस कर्मचार्यांना शिवीगाळ केल्याची घटना माळीवाड्यातील भोपळेगल्ली येथे दि. ३० रोजी दुपारी बारा वाजता घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्याचे पोकॉ अभय कदम यांनी तुषार तुळशीराम बाबर (रा. भोपळेगल्ली, माळीवाडा) याच्याविरूद्ध फिर्याद दिली आहे.
कदम यांनी फिर्यादीत म्हटले, की दि. ३० रोजी दुपारी बारा वाजता भोपळेगल्ली येथे बॅरेकेटींगचे काम सांगून पोकॉ अभय कदम व पोकॉ खताडे फुलसौंदर चौकात बॅरेकेटिंग पॉईंट निश्चित करण्यासाठी गेले. भोपळेगल्ली येथे बॅरेकेटींगचे काम करणार्या कामगाराने फुलसौंदर चौकात येऊन तुषार तुळशीराम बाबर याने बॅरेकेटींग करू नका, असे म्हणून लोखंडी बॅरेकेटींग काढून फेकून दिल्याचे सांगितले. त्यानंतर पोकॉ कदम व पोकॉ खताडे भोपळेगल्ली येथे गेले.
तुषार बाबर यास श्रीराम नवमीची शोभा यात्रा जाणार असल्याने बॅरेकेटींग जरूरीचे असल्याचे सांगितले. बाबर याने अरेरावीची भाषा वापरून तू याठिकाणी नोकरी कशी करतो, तेच बघतो, असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच त्याने त्याच्या डेअरीच्या दारात असलेली बादली जोरजोरात आपटून आरडाओरड करून लोकांची गर्दी जमा केली.
COMMENTS