अहमदनगर | नगर सह्याद्री अहिंसा परमो धर्म: अशा महान परममंत्राचा उपदेश देत संपूर्ण मानवजातीला दिशा देणार्या भगवान महावीर स्वामींची जयंती (ज...
अहमदनगर | नगर सह्याद्री
अहिंसा परमो धर्म: अशा महान परममंत्राचा उपदेश देत संपूर्ण मानवजातीला दिशा देणार्या भगवान महावीर स्वामींची जयंती (जन्मकल्याणक) मंगळवारी नगरमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यानिमित्त सकाळी सकल जैन समाजातर्फे शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
याशिवाय चौक सजावट, रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली. शोभायात्रेनंतर आनंदधामच्या पवित्र प्रांगणात साधूसाध्वीजींनी भगवान महावीर स्वामींच्या जीवन चरित्रावर प्रवचन दिले.
महावीर जयंतीदिनी सकाळी ७.३० वाजता कापड बाजार जैन मंदिरापासून भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. शोभायात्रेत सनई, नगारा, चौघडा, बॅण्ड पथक, डोयावर मंगल कलश घेतलेल्या मुली, विविध वेशभूषा परिधान केलेले लहान मुले, मुली, पांढरे वस्त्र परिधान केलेले पुरुष व केसरी, पिवळ्या, लाल साड्या परिधान केलेल्या महिला भगिनी सहभागी झाल्या. आनंदसंस्कार शिक्षा अभियान मधील ८० विद्यार्थ्यांनी चौकाचौकात लेझीम नृत्य सादर केले. भगवान महावीर स्वामींची भव्य प्रतिमा असलेलश रथ मिरवणसकीत होते. शोभायात्रेत कापड बाजार जैन मंदिर, श्रावक संघाचे पदाधिकारी, भारतीय जैन संघटना, जैन सोशल फेडरेशन, सिमंधर स्वामी भक्त मंडळाचे पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते.
शोभायात्रा कापडबाजार, अर्बन बँक चौक, घुमरे गल्ली, गुजर गल्ली, आदेश्वर जैन मंदिर, लक्ष्मी कारंजा, चितळे रोड, नेता सुभाष चौक, नवीपेठ जैन स्थानक, घासगल्ली, महात्मा गांधी रोड, तेलीखुंट चौक, दाळमंडई, आडतेबाजार, गंजबाजार, सराफबाजार, जुना कापडबाजार, खिस्तगल्ली, बुरूडगल्ली, जुनी वसंत टॉकीज, सहकार सभागृहमार्गे धार्मिक परीक्षा बोर्ड आनंदधाम येथे दाखल झाली. शोभायात्रा मार्गावर विविध मंडळे, जैन भाविकांनी आकर्षक चौक सजावट केली होती. रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. ‘त्रिशलानंदन वीर की, जय बोलो महावीर की’ अशा घोषणा देण्यात आल्या.
शोभायात्रेनंतर आनंदधाम येथे महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी महाराज, प्रबुद्ध विचार आदर्शऋषीजी महाराज, पंडितरत्न पूज्य पद्मऋषीजी महाराज, संस्कारप्रेमी पूज्य अलोकऋषीजी महाराज, पंडितरत्न पूज्य पद्मऋषीजी महाराज, साध्वीजी पूज्य सत्यप्रभाजी म.सा., पूज्य त्रिशलाकंवरजी, म.सा., पूज्य पुष्पकंवरजी म.सा, पूज्य दिव्यदर्शनाजी म.सा, पूज्य सम्यकदर्शनाजी म.सा, पूज्य विश्वदर्शनाजी म.सा., पूज्य उदयप्रभाजी म.सा., पूज्य अर्चनाश्रीजी म.सा., पूज्य विचक्षणाजी म.सा., पूज्य सुचेताजी म.सा., पूज्य आराधनाश्रीजी म.सा., पूज्य पियुषदर्शनाजी म.सा., पूज्य विभक्तीजी म.सा आदी साधू साध्वीजींच्या सानिध्यात प्रवचन तथा गुणगाण झाले. यावेळी श्रावक संघाचे उपाध्यक्ष आनंदराम मुनोत, जैन मंदिर अध्यक्ष सुभाष मुथा, श्रावक संघाचे सेक्रेटरी संतोष बोथरा, बडीसाजन श्री संघाचे अध्यक्ष पेमराज बोथरा, संतोष गांधी, अशोक (बाबुशेठ) बोरा, डॉ. प्रकाश कांकरिया, श्रावक संघ, धार्मिक परीक्षा बोर्ड, जैन सोशल फेडरेशनसह विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. पूज्य अर्चनाजी म.सा. यांनी सुंदर स्तवन सादर केले. कार्यक्रमानंतर पेमराज, संतोष, सतीश बोथरा (पारस ग्रुप)परिवाराच्यावतीने सर्वांसाठी गौतम प्रसादीची व्यवस्था करण्यात आली होती.
प्रबुद्ध विचारक पूज्य आदर्शऋषीजी महाराज म्हणाले, भगवान महावीर यांच्या जन्माला जन्मकल्याणक म्हटले जाते. जन्मकल्याणक हे आत्म्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे असते. राजभवनाबाहेर पडत त्यांनी साडेबारा वर्षांची कठोर साधना केली. यातून ते केवलज्ञानी झाले. आपल्याला प्राप्त आत्मज्ञानाचा उपयोग त्यांनी समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी केला. अहिंसा, सत्य आणि अपरिग्रहाचा विचार त्यांनी कायम मांडला. जो आजच्या काळातही तितकाच महत्त्वपूर्ण आहे.
आनंदधाम येथे प्रभावना वाटप
भगवान महावीर जयंतीनिमित्त नगरमध्ये मिरवणूक मार्गावर विविध संस्था, मंडळांनी साधू साध्वीजी यांच्या निदर्शानुसार प्रसाद वाटप न करता आनंदधाम येथे सगळ्यानी प्रभावना वाटप केले. भगवान महावीर यांचा स्वच्छतेचा संदेश सर्वांनी अंमलात आणला. या उपक्रमाचे सर्वांनी स्वागत करून सहकार्य केले.
रांगोळी स्पर्धेचा निकाल ः प्रथम क्रमांक विभागून- सोनाली व पूजा (आनंदधाम) आणि मिनल पारख, राखी गांधी, प्रीती पोखरणा, साक्षी, लब्धी चंगेडिया (आनंदधाम). द्वितीय क्रमांक विभागून- सिया, स्नेहल, रचना निखिल गुगळे (चितळे रोड), अखिल भंडारी (लक्ष्मीबाई कारंजा चौक). तृतीय क्रमांक विभागून- सिद्धी गांधी, ऐश्वर्या, मृणाल मुथा आणि प्रेक्षा व दर्शना नहार. उत्तेजनार्थ पारितोषिके- मीत, निरज चंगेडिया (खिस्तगल्ली), क्रांती सानप (गंजबाजार), प्रिया गांधी ( खिस्तगल्ली).
COMMENTS