शेती पिकांचे प्रचंड नुकसान! | हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील खडकवाडी, पळशी, वनकुटे ...
शेती पिकांचे प्रचंड नुकसान! | हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुयातील खडकवाडी, पळशी, वनकुटे येथे शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसासह गारपिटीने शेतकर्यांच्या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये कलिंगड, खरबूज, टोमॅटो, कांदा व झेंडू हे पीक काढणीला आलेले असताना हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. त्यामुळे एकीकडे शेतीमालाला भाव नसल्याने व दुसरीकडे अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. टाकळी ढोकेश्वर व परिसरातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती्.
शुक्रवारी सायंकाळी वादळी वार्यासह गारपीट झाल्याने शेतात काढणीसाठी आलेली पिके झाकण्यासाठी शेतकरी वर्गाची मोठी धावपळ उडाली. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी महसूल विभागाने त्वरित करून पंचनामे करावी. याअगोदर झालेल्या गारपिटीने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून शेतकरी सावरत होता त्यातच पुन्हा अवकाळी पावसाच्या गारपिटीने शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतीमालाला भाव नाही, शेतकरी आर्थिक संकटात आहे, अचानक आलेल्या वादळी वारा गारपिटीसह पावसाने शेतात असलेल्या पिकांची नुकसान केले. यामध्ये विकास रोकडे, आनंदा खोडदे, शिवाजी तळेकर गुरुजी, भाऊसाहेब फटांगरे, अशोक फटांगरे, भाऊसाहेब शिंगोटे, प्रताप रोकडे, किरण रोकडे, अरविंद रोकडे, मारुती रोकडे, पंकज गागरे, सतीश फटांगरे, शिवाजी गागरे, बन्सी गागरे, गोविंद गागरे, सचिन फटांगरे, अंबादास नवले, धनंजय ढोकळे, गणेश शिंदे, नानासाहेब गागरे, गंगाराम मोढवे, नितीन जाधव, गुलाब केसकर, योगेश जाधव, संदीप शिंदे, विश्वनाथ शिंदे, राजेंद्र जाधव, अमोल जाधव, साहेबराव गाजरे,सतीश फटांगरे, शिवाजी गागरे, बन्सी गागरे, गोविंद गागरे, सचिन फटांगरे, इ. शेतकर्यांसह परिसरातील अनेक शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.
खडकवाडी, पळशी येथे अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे प्रचंड नुकसान शेतकर्यांचे झालेले आहेत. अद्याप पूर्वीचे नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्यांपर्यंत पोहोचलेली नाही, तोच पुन्हा एकदा निसर्ग कोपला आहे. त्यात शेतकरी वर्ग पूर्णपणे खचला आहे. तरी शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.
- काशिनाथ दाते
सभापती, बांधकाम व कृषी समिती जि.प. अहमदनगर
हाता तोंडाशी आलेले पीक होते. शेती उभारण्यात खूप पैसे खर्च करावे लागतात. त्यात असे नुकसान झाले, माझे १० एकर कलिंगड, ३ एकर खरबूज, २ एकर झेंडू या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सरकारने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.
- विकास रोकडे, शेतकरी खडकवाडी
शेवगाव तालुक्यात तुफान पाऊस
पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
ढोरजळगाव | नगर सह्याद्री
शेवगांव तालुयाच्या पश्चिम भागातील ढोरजळगावने भातकुडगांव, भातकुडगांव फाटा, भायगांव, बक्तरपुर, देवटाकळी, शहरटाकळी परीसरात शुक्रवारी अवकाळी पाउस व प्रचंड गारपीट झाली.
गारपिटीने कांदा पिकाला पातच राहिली नसुन काढणीला आलेल्या, काढलेल्या गहु व कांदा पिकांत मोठ्या प्रमाणात पाणी साठले. शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आमदार मोनिकाताई राजळे यांनी सकाळी ९ वा गारपीटीने व अतिपावसाने नुकसान झालेल्या शेतक-यांच्या शेतावर जाऊन पिकांची पाहणी केली.पडझड झालेल्या शेतकर्यांच्या घराची पाहणी करून मंडळ अधिकारी, कृषिअधिकारी व महसुल विभागाला त्वरीत पंचनामे करण्याच्या सुचना देण्यात आल्या. पालकमंत्री व कृषिमंत्री यांच्याकडे लवकरांत लवकर पंचनामे पुर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आमदार राजळे यांनी सांगितले. यावेळी बापुसाहेब पाटेकर, गणेश कराड, आनंता ऊर्किडे बाळासाहेब कराड, महादेव पाटेकर, तालुका कृषिआधिकारी अंकुश टकले,नायब तहसिलदार रविंद्र सानप, महसुल मंडळ अधिकारी आप्पासाहेब शिंदे, संभाजी फटांगरे, लक्ष्मण फटांगरे, डॉ श्याम काळे, रमेश कळमकर, मधुकर फटांगरे, मानिक शेकडे, आशोक देशपांडे, सुरेश बडे, गणेश सामृत, संदीप खरड, मुसा शेख, सरपंच महादेव पवार, उपसरपंच सुभाष बडधे, दत्तु वाघमोडे, लक्ष्मण नजन, सचिन तोंगे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळासह पाऊस : पिकांचे मोठे नुकसान
अहमदनगर / नगर सह्याद्री -
शुक्रवारी रात्र्री जिल्ह्यातील शेवगाव, नेवासा, पारनेर तालुक्यातील काही गावांमध्ये वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोराचा पाउस व गारपिट झाली.त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या कांदा, गहू ,संत्रा ,आंबा ,डाळींब या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेवगाव तालुुक्यातील मठाची वाडी, शहरटाकळी, भाविनिमगाव, भायगाव, दादेगाव परीसरात पाउस झाला. भाविनिमगाव येथे माधव चेडे यांच्या शेतातील नारळाच्या झाडावर विज पडल्याने झाडालाच आग लागली होती. नेवासा तालुक्यातील भेंडा, कुकाणा, देवगाव, जेउर, तरवडी या भागात पाउस झाला. चिलेखनवाडी येथेही झाडावर विज पडून झाड पेटले.
COMMENTS